मावळात दिवसभरात रुग्ण संख्येचा कळस; १११ पॉझिटिव्ह, सहा मृत्यू

Corona-Test
Corona-Test

वडगाव मावळ - मावळ तालुक्यात  शनिवारी कोरोना रुग्ण संख्येचा कळस झाला तर सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली. दिवसभरात तब्बल १११ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले  तर कोरोनाबाधित सहा जणांचा मृत्यू झाला. वराळे येथील ५४ वर्षीय पुरुष, कुसगाव बुद्रुक येथील ६० वर्षीय महिला, मळवंडी ठुले येथील ५० वर्षीय पुरुष, तळेगाव दाभाडे येथील ५८ वर्षीय पुरुष, लोणावळा येथील ६६ वर्षीय महिला व  इंदोरी येथील ७१ वर्षीय पुरुषाचा मृतांमध्ये समावेश आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या २ हजार २८८ झाली असून  आत्तापर्यंत ९० जणांचा मृत्यू  झाला आहे. १ हजार ५८७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या १११ जणांमध्ये लोणावळा येथील सर्वाधिक ७२, कामशेत येथील १३, तळेगाव दाभाडे येथील आठ, वडगाव येथील पाच, सोमाटणे येथील दोन तर शिरगाव, माळवाडी, कुसगाव बुद्रुक, वराळे, धामणे, इंदोरी, कान्हे, भाजे, कुणे नामा, कार्ला व आपटी गेव्हडे येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे.  तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या २ हजार २८८ झाली असून त्यात शहरी भागातील १ हजार २५३ तर ग्रामीण भागातील १ हजार ३५ जणांचा समावेश आहे. तळेगावात सर्वाधिक ७५८, लोणावळा येथे ३४० तर वडगाव येथे रुग्णसंख्या १५५ एवढी झाली आहे.

आत्तापपर्यंत ९० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ हजार ५८७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी २२ जणांना घरी सोडण्यात आले. सध्या तालुक्यात ६११ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील ३६४ जण लक्षणे असलेले तर २४७ जण लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या ३६४ जणांपैकी २६६ जणांमध्ये सौम्य तर ८२ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. १६ जण गंभीर आहेत. सध्या ६११ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची माहिती तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com