पिंपरी : 'राष्ट्रवादीच्या वॉर्डातील निधी महापौरांनी वळवला' 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

- विरोधी पक्षनेते मिसाळ यांचा आरोप ​

पिंपरी : निगडीतील भक्ति-शक्ती चौकातील ग्रेडसेपरेटर व उड्डाणपुलाचे सुशोभिकरण केले जाणार आहे. त्यातील 50 लाख रुपयांसह शहरातील विविध कामांतील एक कोटी 26 लाख रुपये महापौरांनी स्वतःच्या सांगवी प्रभागासाठी वर्ग केला आहे. हा निधी राष्ट्रवादी कॉंग्रेस नगरसेवकांच्या वॉर्डातील कामांचा असल्याचा आरोप महापालिका विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी शुक्रवारी (ता. 25) केला. 

भोसरीनंतर आता पिंपरीत ट्रान्सफॉर्मरचा स्फोट 

पिंपरी ते निगडीपर्यंतच्या मेट्रो विस्तारीकरणाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात 

जुलै महिन्यातील सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपने उपसुचनेद्वारे सुमारे एक कोटी 26 लाख रुपये प्रभाग 32 मधील नॅशनल स्कूलपासून स्पायसर पुलापर्यंत व अन्य रस्ते अद्यायावत पद्धतीने विकसित करण्यासाठी वेगवेगळ्या कामांमधून वर्ग केले. यात प्रभाग 15 मधील भक्‍ति-शक्ती चौकातील ग्रेडसेपरेटर व उड्डाणपुलाच्या सुशोभिकरणासाठी रंगीत दिवे प्रणालीच्या कामांसाठीचे 50 लाख रुपयांचा समावेश आहे. ही खेदजनक बाब आहे. विशेष म्हणजे महापौरांच्या प्रभागातील रस्त्यासाठी जागा ताब्यात नाही, असा आरोप मिसाळ यांनी केला आहे. 

ते विरोध करणारच : महापौर 

महापौर उषा ढोरे म्हणाल्या, "माझ्या प्रभागातील रस्त्यासाठी स्वतंत्र निधी आहे. भक्ति-शक्ती उड्डाणपुलाच्या सुशोभिकरणाच्या तरतुदीतून कोणताही निधी वर्ग केलेला नाही. ते विरोधक आहेत, आरोप करणारच. त्यावर मला काहीही बोलायचे नाही.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mayor diverted funds by ncp's ward alleged opposition leader raju misal