सांगवीतील मयुरी देशमुख भारतातील पहिली महिला ऑफशोअर फ्लाईंग कॅप्टन

स्वप्नांना जिद्द व कष्टाचे बळ असले की यश आकाशाला गवसणी घालते.अशीच गगनभरारी घेत सांगवीतील मयुरी देशमुख हीने भारतातील पहिली महिला ऑफशोअर फ्लाईंग कॅप्टन म्हणून मान मिळवला आहे.
Mayuri Deshmukh
Mayuri DeshmukhSakal
Summary

स्वप्नांना जिद्द व कष्टाचे बळ असले की यश आकाशाला गवसणी घालते.अशीच गगनभरारी घेत सांगवीतील मयुरी देशमुख हीने भारतातील पहिली महिला ऑफशोअर फ्लाईंग कॅप्टन म्हणून मान मिळवला आहे.

जुनी सांगवी - स्वप्नांना जिद्द व कष्टाचे बळ असले की यश आकाशाला गवसणी घालते.अशीच गगनभरारी घेत सांगवीतील मयुरी देशमुख (Mayuri Deshmukh) हीने भारतातील (India) पहिली महिला (First Women) ऑफशोअर फ्लाईंग कॅप्टन (Offshore Flying Captain) म्हणून मान मिळवला आहे. नुकताच तिचा नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे.

जुनी सांगवीतील शितोळे परिवार हे आजोळ असलेली मयुरी देशमुख ही ऑफशोअर फ्लाईंग कॅप्टन पद भूषविणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे.तिच्या वडीलांपासून प्रेरणा घेत ती या क्षेत्रात गगनभरारी घेत आहे. तिच्या कुटूंबात तिच्यासह वडील,तीची धाकटी बहीण असे तिघेजण पायलट आहेत. एकाच कुटुंबातील तिघेही पायलट क्षेत्रात कार्यरत असल्याचे चित्र क्वचितच पहावयास मिळते.

वडील विश्वासराव देशमुख हे एअरफोर्स मध्ये हेलिकॉप्टर पायलट होते. ते सन २००३ मध्ये सेवानिवृत्त झाले. आई अंजली देशमुख या गृहिणी आहेत. धाकटी बहीण राधिका देशमुख ही एअरलाइन्समध्ये पायलट कॅप्टन आहे.

मयुरीने शालेय शिक्षण ते पदवी पर्यंतचे शिक्षण पुण्यातच पूर्ण केले. भारतातील पहिली महिला ऑफशोअर पायलट म्हणून मुंबईतून दररोज शेकडो नागरी विमाने उड्डाण करतात. अनेक अरबी समुद्रात उड्डाण करण्यासाठी पश्चिमेकडे जातात. यापैकी काही कॉकपिटमध्ये महिला वैमानिक आहेत.संपूर्ण भारतात त्यापैकी महिला वैमानिक २७०० पेक्षा अधिक आहेत. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनी, मयुरी देशमुख हिने कमांडरच्या आसनावर बसून एका विमानातून भरारी घेतली. जुहू विमानतळावरून मुंबई हाय' साठी हेलिकॉप्टरचे उड्डाण होते. पवन हंसची कॅप्टन मयुरी देशमुख ही भारतातील पहिली महिला आहे जी ऑफशोअर फ्लाइटवर कमांड इन उड्डाण करते. "ऑफशोअर" म्हणजे फक्त किनाऱ्यापासून काही अंतरावर समुद्रात वसलेले जसे की मुंबई हाय, भारतातील सर्वात मोठे तेल क्षेत्र, देशात फक्त एक महिला पायलट ऑफशोअर फ्लाइट चालवते ती म्हणजे कॅप्टन 'मयुरी देशमुख'.

फ्लोरिडा फ्लाइंग स्कूलमधून २००८ मध्ये हेलिकॉप्टर परवाना मिळविल्यानंतर, मयुरीने २०१५ मध्ये सरकारी पवन हंस लिमिटेड मध्ये सामील होण्यापूर्वी कॉर्पोरेट फ्लाइट चालवणाऱ्या दोन खाजगी हेलिकॉप्टर कंपन्यांमध्ये काम केले. एका वर्षासाठी तिने ईशान्येकडील टेकड्यांपासून अंदमान निकोबारच्या बेटांपर्यंत विशाल आणि भौगोलिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण भारतीय भूभाग ओलांडून किनाऱ्यावर उड्डाण केले. प्रवाशांना विमानतळावरून दुर्गम भागात नेण्याचा मौल्यवान अनुभव यावेळी मयुरीने मिळविला. त्यानंतर २०१६ मध्ये तिने ऑफशोअर ऑपरेशन्सचे प्रशिक्षण पूर्ण केले होते.

आयएएफ हेलिकॉप्टर पायलट असलेल्या वडिलांकडून आकाशात झेप घेण्याचे बाळकडू मिळविलेल्या मयुरीचे हे यश सर्वच तरुणींसाठी प्रेरणादायी आहे. या यशाबद्दल सांगवीकरांमधून तिचे कौतुक होत आहे. जुनी सांगवीतील शितोळे परिवार हे मुयुरीचे आजोळ आहे. पुण्यातील कसबा पेठेतील शितोळे परिवार जुनी सांगवीसह पुण्यातील ईतर भागात वास्तव्यास आहेत तर मयुरी सध्या औंध येथील रक्षक सोसायटी येथे वास्तव्यास आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com