एमआयडीसीतील कामगारांची पायपीट; पीएमपीएलचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 December 2020

पिंपरी-चिंचवड शहरात शेकडो असंघटित कंत्राटी आणि हंगामी कामगार चाकण, म्हाळुंगे, तळवडे, भोसरी, पिंपरी, चिंचवड या एमआयडीसी हिंजवडी फेज क्रमांक एक, दोन, तीनच्या औद्योगिक क्षेत्रात काम करतात. परंतु त्यांना कामावर जाण्यासाठी खात्रीशीर सेवा नसल्याने त्यांना खासगी सेवेशिवाय पर्याय नाही. प्रवासावरच खर्च होत आहे.

पिंपरी - शहरात शेकडो असंघटित कंत्राटी आणि हंगामी कामगार चाकण, म्हाळुंगे, तळवडे, भोसरी, पिंपरी, चिंचवड या एमआयडीसी हिंजवडी फेज क्रमांक एक, दोन, तीनच्या औद्योगिक क्षेत्रात काम करतात. परंतु त्यांना कामावर जाण्यासाठी खात्रीशीर सेवा नसल्याने त्यांना खासगी सेवेशिवाय पर्याय नाही. प्रवासावरच खर्च होत आहे. त्यांच्या कामाच्या शिफ्ट प्रमाणित बससेवा सुरू करण्याची मागणी कामगारांतून होत आहे. या कामगारवर्गाकडे पुणे महानगर परिवहन महामंडळाने दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून येत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टाटा मोटर्स, महिंद्रा, बजाज, जॉन डिअर, फोर्स मोटर्स, मर्सिडीज या महत्त्वाच्या वाहन उद्योगासाठी शेकडो लघू आणि मध्यम कारखाने पुरवठादार आहेत. तळवडे, रुपीनगर, चिखली, मोरेवस्ती, त्रिवेणीनगर, भोसरी, घरकुल वसाहत, वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, दळवीनगर, आकुर्डी या परिसरात सरासरी दहा हजाराहून कमी वेतन घेणाऱ्या बॅचलर हजारो युवक युवती या परिसरात कॉटबेसेसवर किंवा पेइंग गेस्ट म्हणून भाड्याच्या घरात राहतात. त्यांना प्रवास भत्ता मिळत नाही, वेतनातील मोठा खर्च त्यांना कामावर जाण्यासाठी करावा लागत आहे.  

पिंपरी-चिंचवड शहरात 223 नवीन रुग्ण; तर ९ जणांचा मृत्यू

डेमोक्रॅटिक युथ फेडरेशनचे कार्यालयीन सचिव अमिन शेख व अध्यक्ष गणेश दराडे  म्हणाले, ‘आकुर्डी रेल्वे स्टेशन, निगडी, त्रिवेणीनगर, तळवडे, घरकुल वसाहत, चिंचवडगाव, चिखलीगाव, नेहरूनगर, संत तुकारामनगर, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, काळेवाडी या परिसरातून तळेगाव, म्हाळुंगे, चाकण अशी अप डाउन बससेवा फक्त कामगारांसाठी सुरू करून त्याची फ्रिक्वेन्सी वाढवावी. हिंजवडी फेज क्रमांक १, दोन  आणि ३ येथे अलीकडच्या काळात कंत्राटी काम करणारे शेकडो कामगारांना शहरातून प्रवासी सेवा देणे गरजेचे आहे.’

...तर वायसीएम पुन्हा कोविड सेंटर

कामगारांच्या मागणीचा विचार करून लवकर निर्णय घेता येईल. कामगारांची सोय होणे महत्त्वाचे आहे.
- सुभाष गायकवाड, जनसंपर्क अधिकारी, पीएमपीएमएल

पिंपरी चिंचवड महापालिक राबविणार कुष्ठरोग, क्षयरोग निदान मोहीम

Edited By - Prashant Patil

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MIDC Worker Walking Job Ignoring By PMPL