Wakad : वारीला जाण्याची इच्छा अन् शोधला मार्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wakad : वारीला जाण्याची इच्छा अन् शोधला मार्ग

Wakad : वारीला जाण्याची इच्छा अन् शोधला मार्ग

- बेलाजी पात्रे

वाकड : एसटी कर्मचाऱ्यांचा संप अन विठुरायाच्या भेटीची आस अशा द्विधा मनःस्थितीत. मात्र ईच्छा तिथे मार्ग याप्रमाणे अखेर या दोघांनी उपाय शोधला. चक्क सायकलवर पंढरपूर वारी करण्याचे त्यांनी ठरविले आयटी नगरीतील दोघा जेष्ठ हरी भक्तांनी थेट सायकलवारी करून एकीकडे तंदुरुस्त रहा, व्यायाम करा असा सामाजिक संदेश देत कार्तिकीला पांडुरंगाचे दर्शन घेतले.

हेही वाचा: चित्रा वाघ यांना भाजपकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी?

वाकड येथील हभप. काळूराम ज्ञानोबा भुजबळ (वय ७३) व हिंजवडीतील हभप. देवीदास दत्तू साखरे (वय ७०) असे वाकड आळंदी ते पंढरपूर व पंढरपूर ते वाकड सायकल वारी करणाऱ्या हरी भक्तांची नावे आहेत. आयुष्यभर ऊन, वारा, पाऊस सोसत असंख्य पायी वाऱ्या केलेल्या या जेष्ठ वारकऱ्यांना कोरोनामुळे सलग दोन वर्षे वारीला मुकावे लागले त्यामुळे महिन्याच्या नवमी आणि एकादशीला हे एसटीने पांडुरंगाच्या दर्शनास जात मात्र कार्तिकी एकादशी जवळ आली अन एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू झाला तसा या दोघांना काहीही गोड लागेना, कशातही जीव लागेना.

शुक्रवारी (ता. १२) पहाटे चार वाजता वाकड येथून प्रवास सुरु झाला. वाटेत तरड गावला मुक्काम करून दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा प्रवास करीत शनिवारी सायंकाळी ते पंढरपूरला पोहचले. तेवढाच परतीचा सायकल प्रवास धरून सुमारे ४५० ते ५०० किलोमीटर अंतर कापून ते बुधवारी सायंकाळी (ता. १७) वाकडला परतणार आहेत वाकडला पोहचताच ग्रामस्थांच्या वतीने सन्मान होणार आहे.

हेही वाचा: भाजपने पैसे वाटले, दंगलीचं रचलं सुनियोजित षडयंत्र - नवाब मलिक

भुजबळ हे स्वतः मृदंग वादक व गायक आहेत तर देविदास साखरे विणेकरी व गायक आहेत. या दोघांनी अनेक पायी वारी केल्यात त्यापैकी ज्ञानेश्वर महाराज पालखी आळंदी ते पंढरपूर, तुकाराम महाराज देहू ते पंढरपूर, निवृत्ती महाराज पालखी त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर, सोपानकाका महाराज पालखी सासवड ते पंढरपूर, संत मुक्ताबाई पालखी जळगाव ते पंढरपूर, निवृत्तीनाथ समाधी सोहळा माण गाव ते त्र्यंबकेश्वर, नीलकंठेश्वर पालखी सोहळा काळेवाडी ते नीलकंठेश्वर इत्यादी.

loading image
go to top