मावळात आज १२९ जण पॉझिटिव्ह, तर दोघांचा मृत्यू      

ज्ञानेश्वर वाघमारे
Monday, 21 September 2020

मावळ तालुक्यात सोमवारी दिवसभरात १२९ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले, तर कोरोनाबाधित दोघांचा मृत्यू झाला.

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात सोमवारी दिवसभरात १२९ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले, तर कोरोनाबाधित दोघांचा मृत्यू झाला. तळेगाव येथील ७५ वर्षीय व वडगावमधील ५२ वर्षीय पुरुषांचा मृतांमध्ये समावेश आहे. तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या तीन हजार ९६३ व मृतांची संख्या १२७ झाली आहे. दोन हजार ८०२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

पिंपरी-चिंचवडमधील रस्ते जलमय; सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस

सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या १२९ जणांमध्ये लोणावळा येथील सर्वाधिक ४५, तळेगाव दाभाडे येथील १६, इंदोरी येथील १२, कान्हे येथील ११, वडगाव येथील १०, कुसगाव बुद्रुक येथील सहा, कामशेत व कडधे येथील प्रत्येकी पाच, नवलाख उंब्रे येथील तीन, चांदखेड, सोमाटणे, सुदवडी व जांभूळ येथील प्रत्येकी दोन; तर माळवाडी, कुरवंडे, कुणे नामा, काले, करंजगाव, अजीवली, नेसावे व तळेगाव दाभाडे ग्रामीण येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. 

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाबत समुपदेशन; आतापर्यंत 15 हजारांवर नागरिकांचं शंकासमाधान

तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या तीन हजार ९६३ झाली असून, त्यात शहरी भागातील दोन हजार २८९ व ग्रामीण भागातील एक हजार ६७४ जणांचा समावेश आहे. तळेगावात सर्वाधिक एक हजार २१६,  लोणावळा येथे ८३४, तर वडगाव येथे रुग्णसंख्या २३९ एवढी झाली आहे. आतापर्यंत १२७ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, दोन हजार ८०२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारी १३६ जणांना घरी सोडण्यात आले. 

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो 2023 मध्ये धावणार? 

सध्या तालुक्यात एक हजार ३४ सक्रिय रुग्ण असून, त्यातील ६२७ लक्षणे असलेले व ४०७ लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या ६२७ जणांमध्ये ४८० जणांमध्ये सौम्य, तर १४४ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. तीन जण गंभीर आहेत. सध्या सक्रिय असलेल्या एक हजार ३४ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरू असल्याची मावळ तालुका कोविड कक्षाचे समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 129 corona positive found in maval on monday 21 september 2020