पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी नवीन १२९६ रुग्ण 

Corona
Corona

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी १२९६ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या एक लाख १८ हजार १९२ झाली आहे. काल ४०६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख सात हजार ५०२ झाली आहे. सध्या आठ हजार ७९७ सक्रिय रुग्ण आहेत. काल शहरातील चार रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र, यापूर्वी वेगवेगळ्या रुग्णालयात मृत्यू झालेल्या पाच रुग्णांची माहिती काल महापालिकेला कळविण्यात आली. कालपर्यंत शहरातील एक हजार ८९३ आणि शहराबाहेरील ७९६ जणांचा मृत्यू झाला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या रुग्णालयांत एक हजार ८८६ रुग्ण उपचार घेत आहेत. सहा हजार ९११ रुग्ण होम आयसोलेट आहेत. कालपर्यंत ८० हजार ८९७ जणांना लस देण्यात आली आहे. शहरात सध्या १५९ मेजर कंटेन्मेट झोन आहेत. ८३२ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील एक हजार ५७९ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. त्यातील पाच हजार ४७७ जणांची तपासणी केली. ५१८ जणांचे काल विलगीकरण करण्यात आले. कालपर्यंत एक लाख ५० हजार ७३५ जणांचे विलगीकरण करण्यात आले. काल मृत्यू झालेले शहरातील नागरिक मोशी, पिंपरी, चिंचवड, पिंपळे गुरव, शिवतेजनगर, कोथरूड, वाकडेवाडी, सातारा, करमाळा येथील रहिवासी आहेत. 

काल अ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रात १६४, ब मध्ये २३३, क मध्ये ११३, ड मध्ये २३८, इ मध्ये १३९, फ मध्ये १३६, ग मध्ये १३४ आणि ह मध्ये १३९ असे १२९६ रुग्ण आढळले. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com