पिंपरी-चिंचवडमधील कोरोना रुग्णांचा आकडा 42 हजारांच्या दिशेने

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 23 August 2020

पिंपरी-चिंचवड शहरात आज 750 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज 750 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यामुळे एकूण रूग्ण संख्या 41 हजार 648 झाली आहे. आज 792 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 27 हजार 957 झाली आहे. आज शहरातील सहा व शहराबाहेरील पाच, अशा 11 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 777 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 12 हजार 914 रुग्ण संक्रिय आहेत. 

Video : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आवाहनानंतरही नागरिकांकडून मूर्ती विसर्जनाचा 'घाट' 

--------------

पिंपरी-चिंचवडमध्ये शालेय साहित्य खरेदीसाठी इंग्रजी शाळांची अशी 'दुकानदारी'

आज मृत झालेल्या व्यक्ती काळेवाडी (स्त्री वय 50 व 63), चिंचवड (स्त्री वय 73), थेरगाव (पुरुष वय 46), निगडी (स्त्री वय 45), सांगवी (पुरुष वय 42), जुन्नर (पुरुष वय 50) आंबेगाव (पुरुष वय 39, स्त्री वय 65), खेड (पुरुष वय 50), धानोरी (पुरुष वय 50) येथील रहिवासी होत्या. 

'गौरी'ला यंदा सखींचा गोतावळा नाहीच!

आज दिवसभरात दोन हजार 889 संशयित व्यक्ती रुग्णालयांत दाखल झाल्या. आज दोन हजार 15 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. एकूण दोन हजार 451 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. आज सर्वेलियन पथकांनी 16 हजार 761 घरांना भेटी देऊन 53 हजार 326 जणांचे सर्वेक्षण केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 750 corona positive patients found in pimpri chinchwad on sunday 23 august 2020