पिंपरी-चिंचवड शहरात आज 984 नवीन रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

पिंपरी-चिंचवड शहरात आज 984 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 70 हजार 423 झाली आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज 984 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 70 हजार 423 झाली आहे. आज एक हजार 151 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 59 हजार 968 झाली आहे. सध्या नऊ हजार 62 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील आठ आणि शहराबाहेरील तीन, अशा 11 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 142 आणि शहराबोहरील मृतांची संख्या 365 झाली. 

तिकिटाच्या खेळासाठी कुणात बदल झाला?, मावळ भाजपचा आमदार शेळके यांच्यावर पलटवार

आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक पिंपरी (स्त्री वय 84), चिखली (पुरुष वय 64 व 70), चिंचवड (पुरुष वय 79), निगडी (पुरुष वय 43), काळेवाडी (स्त्री वय 75), भोसरी (पुरुष वय 78), पिंपळे निलख (पुरुष वय 69), विश्रांतवाडी (पुरुष वय 50), धनकवडी (पुरुष वय 71), जुन्नर (स्त्री वय 50) येथील रहिवासी आहेत. 

पिंपरी-चिंचवड : पालिका विषय समित्यांना मिळणार नवीन कारभारी 

कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कातील अर्थात हायरिस्क कॉन्टॅक्‍टमधील नागरिकांची तपासणी करण्यासाठी महापालिकेने आठ दवाखान्यांच्या स्थरावर पथकांची नियुक्ती केली आहे. त्याअंतर्गत रविवारी दिवसभरात सहा हजार 965 घरांमधील 23 हजार 920 नागरिकांची तपासणी केली. आज 116 जणांचे विलगीकरण करण्यात आले. विलगीकरण केलेल्या एकूण व्यक्तींची संख्या 49 हजार 803 झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 984 corona patients found in pimpri chinchwad on sunday 20 september 2020