
कोरोना काळात कोलमडलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पाहता महापालिकेने नॉनमोटाराइज वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन धोरण राबविले आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणांचे सर्वेक्षण करून खासगी वाहने कमीत कमी रस्त्यांवर आणण्याचे महापालिकेचे प्रयोजन आहे.
पिंपरी - कोरोना काळात कोलमडलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पाहता महापालिकेने नॉनमोटाराइज वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन धोरण राबविले आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणांचे सर्वेक्षण करून खासगी वाहने कमीत कमी रस्त्यांवर आणण्याचे महापालिकेचे प्रयोजन आहे.
२०१८ पासून प्रायोगिक तत्वावर अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार हा उपक्रम राबविण्यास शहरात सुरुवात झाली आहे. मात्र, लॉकडाउननंतर खऱ्या अर्थाने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. कोरोना काळात लाखो वाहने बंद होती. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण झाले. कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाण घटले. कार्बनडायआक्साइडचे प्रमाण वातावरणात कमी झाल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला नाही. मधुमेह व फुप्फुसांच्या आजारांवर मात मिळविता आली.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
असा असणार प्रकल्प
अडीच ते तीन मीटर रुंदीचे पदपथ बनविणे, त्याचबरोबर सोसायटी परिसरातील हरित केंद्राचा शोध घेणे, विकसित उद्याने परिसर, मोकळ्या जागांचा शोध घेऊन ती ठिकाणे विकसित करणे. या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक, अरुंद पदपथ, वाहनांसाठी बोलार्ड, दिव्यांगासाठी रबरी पदपथ, पादचारी फलक, मांडव स्वरुपातील बाकडे बैठक व्यवस्था केली जाणार आहे. सायकल ट्रॅकसाठी विशिष्ट रंगाचे मार्क केले जाणार आहेत. त्याचबरोबर पाच ठिकाणी अद्यावत पार्किंग सुविधा केली जाणार आहे. यासाठी गर्दीच्या ठिकाणी शाळा, महाविद्यालये व खासगी आस्थापनांची बैठक घेऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले आहे. महिला व ज्येष्ठांसाठी विनाअपघात पादचारी सुरक्षेसाठी ही व्यवस्था उपयोगी ठरणार आहे. यासाठी ७२ कोटींची तरतूद केली गेली आहे.
Corona Updates : पिंपरी-चिंचवडमध्ये आज १०० नवे रुग्ण
सध्या कुठे राबविणार?
डॉ. डी. वाय पाटील कॉलेज पिंपरी, आकुर्डी रेल्वे स्टेशन, बास्केट ब्रिज, पीसीसीओइ कॉलेज, गंगानगर, आकुर्डी ते बास्केट ब्रिज, गुरुद्वारा चौक, पिंपळे निलख या ठिकाणचे सहा किलोमीटर अंतरावरील रस्ते विकसित केले जाणार आहेत. सध्या २४ मीटर पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे.
दुहेरी खून अन् पत्नीचं अपहरण करणारा आरोपी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गजाआड
लॉकडाउननंतर दळणवळण पूर्ववत झाले आणि पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. गर्दी व प्रदूषणावर मात मिळविण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली. रस्त्यावर कमीत-कमी वाहने आणण्यासाठी शहरातील दाटीवाटीच्या जागांची शोधमोहीम सुरू करण्यात आली. अनावश्यक ठिकाणी होणारी वाहनांची गर्दी टाळण्यासाठी पार्किंगच्या जागांचा शोध घेण्यात आला. या प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पावर पुढील मोहीम शहरभर राबविली जाणार आहे.
- विजय भोजने, बीआरटी प्रवक्ता
Edited By - Prashant Patil