पिंपरी-चिंचवड परिसरात गांजा तस्करीचं सत्र सुरूच; हिंजवडी, चाकणनंतर भोसरीत कारवाई

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 11 October 2020

  • गांजा बाळगल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने भोसरी येथून एकाला अटक केली.

पिंपरी : गांजा बाळगल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने भोसरी येथून एकाला अटक केली. त्याच्याकडून साडेनऊ लाखांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. 

पिंपरी-चिंचवडमध्ये घरफोडीच्या घटना वाढल्या; चिंचवड, दिघीत भरदिवसा चोरी

दत्ता पुरूषोत्तम कल्याणी (वय 25, रा. शिवशक्ती कॉलनी नं. 1, लांडेवाडी, भोसरी, मूळ-लातूर) असे आरोपीचे नाव आहे. कल्याणी याच्याकडे अंमली पदार्थ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शनिवारी (ता. 10) सकाळी पावणे बाराच्या सुमारास पोलिसांनी लांडगे वस्ती परिसरात सापळा रचला. येथील शिवशक्ती कॉलनी नंबर एक व दोनच्या पुढील मोकळ्या मैदानातील रस्त्यालगतच्या झाडीतून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडील दोन पोत्यांची तपासणी केली असता त्याच्याकडे नऊ लाख 37 हजार 500 रुपये किमतीचा 37 किलो 500 ग्रॅम वजनाचा गांजा व 210 रूपयांची रोकड सापडली. हा माल जप्त करून आरोपीवर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

लोणावळा : अश्‍लील डान्स करून गोंधळ घालणाऱ्या नऊ जणांना अटक

दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वीच हिंजवडीत साडेसहा लाखांचा गांजा जप्त करण्यात आला, चार दिवसांपूर्वी चाकण जवळील शेलपिंपळगाव येथे तब्बल वीस कोटींचे मेफेड्रॉन जप्त करण्यात आले. यावरून शहर व परिसरात मोठ्याप्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी व विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nine and half lakh cannabis seized in bhosari