Pimpri news : भोसरीमध्ये पतंगाच्या मांजाने कापला दुचाकीस्वाराचा गळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PIMPRI
पिंपरी : भोसरीमध्ये पतंगाच्या मांजाने कापला दुचाकीस्वाराचा गळा

पिंपरी : भोसरीमध्ये पतंगाच्या मांजाने कापला दुचाकीस्वाराचा गळा

पिंपरी : पतंगाच्या नायलॉन मांजाने दुचाकीस्वाराचा गळा कापल्याची घटना भोसरी येथे घडली. यामध्ये दुचाकीस्वाराच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली.कैलास पवार (रा. भोसरी) असे या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पवार हे शुक्रवारी (ता.१४) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारासदुचाकीवर भोसरीवरून नाशिक(bhosari news ) फाट्याकडे येत होते. लांडेवाडी येथे उतारावरून जात असताना अचानक गळ्याला काही अडकल्यासारखे वाटले. गळ्याला हात लावला असता रक्त दिसले. दुचाकी बाजूला घेऊन पहिले असता गळ्यात मांजा अडकल्याचे स्पष्ट झाले. या घटनेत पवार यांच्या गळ्याला दुखापत झाली. तातडीने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान, नायलॉन मांजावर बंदी असतानाही काही दुकानमध्ये नायलॉन मांजाची(nylon manja) विक्री होत असल्याचे दिसून येते. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :PimpriBhosari
loading image
go to top