Nashik News - Nylon Manja | मांजा वापरल्याप्रकरणी तडीपारीचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik News

Nashik : मांजा वापरल्याप्रकरणी तडीपारीचे आदेश

सिडको : नायलॉन मांजा (Nylon Manja) बाळगल्याप्रकरणी सिडकोत तडीपारीची कारवाई केल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलिसांकडून झालेल्या कारवाईचे पर्यावरणप्रेमींनी स्वागत केले आहे. निशांत किशोर सोनकर (रा. महाराणा प्रताप चौक ,सिडको) यांच्याविरोधात तडीपारीचे आदेश काढले. या व्यक्तीला ३० जानेवारीपर्यंत नाशिक शहर (Nashik City) आणि जिल्ह्यातून तडीपार केले आहे.

हेही वाचा: Omicron Update : गाव अन् घर न सोडता झाली ओमिक्रॉन लागण...

४ जानेवारी २०२२ च्या अधिसूचनेनुसार नाशिकसह सिडको परिसरात नायलॉन मांजाविक्री, निर्मिती, साठा व वापरावर बंदी घातली आहे. त्यानुसार परिमंडळ २ चे उपायुक्त विजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी कारवाई केली आहे.

'नागरिकांना जर कुणी नायलॉन मांजाविक्री करत असेल तर याची माहिती पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.'

- विजय खरात, उपायुक्त, परिमंडळ

Web Title: Nylon Manja Used Case Tadipari Orders

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashik
go to top