esakal | जुनी सांगवीतील घोलप महाविद्यालयाने विद्यापीठाला केली 'ही' मदत 
sakal

बोलून बातमी शोधा

जुनी सांगवीतील घोलप महाविद्यालयाने विद्यापीठाला केली 'ही' मदत 

जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवीतील बाबूरावजी घोलप महाविद्यालयातर्फे मास्क, हॅंड सॅनिटायझर विद्यापीठाकडे देण्यात आले. 

जुनी सांगवीतील घोलप महाविद्यालयाने विद्यापीठाला केली 'ही' मदत 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जुनी सांगवी (पिंपरी-चिंचवड) : जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवीतील बाबूरावजी घोलप महाविद्यालयातर्फे मास्क, हॅंड सॅनिटायझर विद्यापीठाकडे देण्यात आले. प्राचार्य नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनातून महाविद्यालयाच्या फॅशन टेक्‍नॉलॉजी विभागामार्फत केलेले साहित्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गैरव्यवहाराचा ठपका

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई, विभाग प्रमुख प्रा. दीपाली जोशी उपस्थित होते. या वेळी डॉ. घोरपडे यांनी कोरोना काळामध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक व नागरिक यांच्यासाठी महाविद्यालयाच्या फॅशन टेक्‍नॉलॉजी व राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत मास्क व रसायनशास्त्र विभागामार्फत हॅंड सॅनिटायझर निर्मिती व वाटप, जनजागृती कार्यशाळा, पोलिस मित्र अशा विविध उपक्रमाविषयी माहिती दिली. 

शिक्षकदिनाच्या पुरस्कारांनाही कोरोनाचा 'संसर्ग'

या वेळी डॉ. करमळकर म्हणाले, "महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्यात हिरिरीने भाग घेऊन योगदान दिले पाहिजे.'' प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा. दीपाली जोशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रणीत पावले, नीलेश शिंदे, सचिन शितोळे, विशाखा लोहार, सुमैय्या शेख, शीतल शेटे, अनुजा माने, सरस्वती देशमुख यांनी परिश्रम घेतले.