पिंपरी-चिंचवड शहरात गुटख्याची खुलेआम विक्री 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 26 December 2020

गुटखा, तंबाखू विक्रीला बंदी असतानाही शहरात पावलोपावली असलेल्या टपऱ्यांवर गुटखा सहज उपलब्ध होत आहे. पोलिस आयुक्‍तालयाचे सामाजिक सुरक्षा पथक व स्थानिक पोलिसांनी मागील काही दिवसात केलेल्या कारवाईत लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आल्याने बंदी असतानाही शहरात गुटख्याचा महापूर सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

सामाजिक सुरक्षा पथकाकडून कारवाई सुरू असतानाही केली जाते वाहतूक 
पिंपरी - गुटखा, तंबाखू विक्रीला बंदी असतानाही शहरात पावलोपावली असलेल्या टपऱ्यांवर गुटखा सहज उपलब्ध होत आहे. पोलिस आयुक्‍तालयाचे सामाजिक सुरक्षा पथक व स्थानिक पोलिसांनी मागील काही दिवसात केलेल्या कारवाईत लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आल्याने बंदी असतानाही शहरात गुटख्याचा महापूर सुरूच असल्याचे दिसून येत आहे. 

गुटखा, तंबाखू विक्रीला सर्वत्र बंदी आहे. त्यामुळे टपऱ्यांवर व दुकानांवर खुलेआम गुटख्याची विक्री होत नसली तरी छुप्या पद्धतीने विक्री सुरूच आहे. पोलिसांना "मॅनेज' केले जात असल्याने स्थानिक पोलिसांकडून कारवाई करण्याकडे काणाडोळा केला जातो. यामुळे गुटखा विक्री करणारेही सुसाट सुटले आहेत. यामुळे शहरासह परिसरातूनही मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री व वाहतूक होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी नेमलेल्या सामाजिक सुरक्षा पथकाने गुटखा विक्री व वाहतूक करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली. हे पथक स्थापन झाल्यानंतर सांगवी, हिंजवडी, वाकड व चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईत गुटखा व इतर साहित्य मिळून तब्बल एक कोटी 26 लाख 46 हजार 676 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामुळे स्थानिक पोलिसही काहीसे ऍक्‍टिव्ह झाले. आयुक्तालयांतर्गत असलेल्या विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गुटखा विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. 

"मीच घरकुलचा डॉन आहे' म्हणत तेरा वाहनांची तोडफोड; तरूणावर प्राणघातक हल्ला

घरातच गुटखा बनविण्याची मशिन 
भोसरी पोलिसांनी गुरुवारी कासारवाडीत एक लाख 65 हजार 720 रुपये किमतीचा गुटखा पकडला. याप्रकरणी पोलिसांनी प्रशांत रोहिदास कुमकर (वय 29, रा. एनडीए रोड, आंगळांबे), संकेत रामचंद्र भडाळे (वय 28, रा. पोकळे वस्ती, धायरीगाव), श्रीधर पोपट रायकर (वय 26, रा. रायकर मळा, धायरीगाव), निखिल अशोक पायगुडे (वय 28, रा. धायरीगाव) यांना अटक केली. दरम्यान, आरोपी घरातच गुटखा बनवत असल्याचे समोर आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी करून धायरी येथील घरातून गुटखा बनविण्याची मशिन ताब्यात घेतली.

पिंपरी-चिंचवड महापालिका शहरात संचारबंदीची "एैशी-तैशी' 

सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई 
ठाणे मुद्देमाल 

सांगवी 11,27,646 
हिंजवडी 43,83,714 
वाकड 34,25,400 
वाकड 15,75,692 
चाकण 21,64,224

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Open sale of Gutkha in Pimpri Chinchwad Crime