पिंपरी शहरातील त्या २४ शाळातील विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग मोकळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RTE School

पिंपरी शहरातील त्या २४ शाळातील विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग मोकळा

पिंपरी - आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या (RTE Admission Process) शैक्षणिक वर्षासाठी ज्या बालकांची सोडतीद्वारे (Draw) निवड झाली आहे. मात्र, अशा विद्यार्थ्यांना (Student) शहरातील २४ शाळांनी विविध कारणांनी प्रवेश (Admission) नाकारला आहे. अशा शाळांची बुधवारी (ता. १८) सुनावणी झाली. पुणे जिल्हा परिषदेत झालेल्या सुनावणीनंतर शाळांनी माघार घेतल्यामुळे आता पाल्याचे प्रवेश होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आरटीई प्रवेशाच्या सुरुवातीलाच सरकारकडील थकीत परताव्यासाठी खासगी शाळांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर शिक्षण विभागाने पाठविलेल्या नोटीसानंतर काही शाळांनी माघार घेऊन आरटीई प्रवेश दिले आहेत. मात्र, त्यापैकी शहरातील २४ शाळांनी आरटीई प्रवेश देण्यास नकार दिला आहे. शिल्लक असलेल्या एक हजार २३३ जागांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. मात्र, शाळांनी परताव्याआभावी प्रवेश थांबविले आहेत. अशा पालकांचा पाल्याच्या प्रवेशासाठी जीव टांगणीला लागला होता. आरटीईची पहिली फेरी संपली आहे. शिल्लक जागांसाठी प्राधान्यक्रमानुसार प्रवेश दिला जाणार आहे. त्याची प्रतीक्षा पालकांना आहे.

हेही वाचा: पुणे : पोलिस आयुक्तालयात आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या सुरेश पिंगळेंचा मृत्यू

शाळा सुरू होऊन दीड महिना झाला आहे. आरटई प्रवेशाच्या सुरुवातीला कोरोनामुळे कागदपत्रे तपासणीस विलंब व शाळांच्या मनमानी कारभारामुळे मुदतवाढ यामुळे बरेचसे विद्यार्थी अद्याप प्रवेशापासून वंचित आहेत. तसेच कागदपत्र पूर्ततेमुळे देखील मुलांचे प्रवेश रद्द होण्याची शक्यता असल्याने आरटीई पालक संघाने पुणे जिल्हा परिषदेकडे पालकांच्या वतीने दाद मागितली होती. याची मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दखल घेतली. शाळांनी माघार घेतल्यामुळे आता पाल्याचे प्रवेश होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

‘शहरातील चोवीस शाळांनी पालकांना स्पष्टपणे प्रवेश नाकारला होता. त्यामुळे निवड यादीतील बहुतांश पाल्यांचे प्रवेश खोळंबले होते. त्या शाळांची सुनावणी घेतल्यामुळे शाळांनी प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे.’’

- अशोक गोडसे, शिक्षण विस्तार अधिकारी, जिल्हा परिषद

‘सरकारने बदलेल्या वयाच्या निकषानुसार आणि दिलेल्या मुदतीत मुलांचा शाळा प्रवेश होणे आवश्‍यक आहे. ज्या शाळा प्रवेश नाकारत आहेत, त्यांच्या विरोधात पुणे जिल्हा परिषदेकडे तक्रार केली होती. सुनावणीनंतर शाळांनी प्रवेश देण्यास मंजुरी दिली आहे.’

- हेमंत मोरे, आरटीई पालक संघ

Web Title: Open The Way For The Students Of Those 24 Schools In Pimpri City

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pimpri ChinchwadAdmission