अनाथआश्रमात विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या कलाकृतीमधून साकारलीय गणपती बाप्पांची आरास

रमेश मोरे
Saturday, 29 August 2020

यंदा कोरोना महामारीच्या संकटामुळे सर्वच क्षेत्रात उदासिनता आहे.अशा काळात आधी लॉकडाऊन व नंतर अनलॉकमधेही कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी नियम व अटींचे पालन करणे गरजेचे बनलेले आहे. सर्वच सण उत्सवावर यावर्षी कोरोना संकटामुळे ते नेहमी सारखे साजरे करता येत नसल्याने एक प्रकारची उदासिनता मरगळ आलेली दिसून येते.मात्र अशा लॉकडाऊन नंतर अनलॉकमधेही निवासी विद्यार्थी आश्रमांमधून विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या कलाकृतीतून साकारलेला गणपती उत्सव विद्यार्थ्यांच्या आनंद उत्साहाची साक्ष देत आहे.

यंदा कोरोना महामारीच्या संकटामुळे सर्वच क्षेत्रात उदासिनता आहे.अशा काळात आधी लॉकडाऊन व नंतर अनलॉकमधेही कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी नियम व अटींचे पालन करणे गरजेचे बनलेले आहे. सर्वच सण उत्सवावर यावर्षी कोरोना संकटामुळे ते नेहमी सारखे साजरे करता येत नसल्याने एक प्रकारची उदासिनता मरगळ आलेली दिसून येते. मात्र, अशा लॉकडाऊन नंतर अनलॉकमधेही निवासी विद्यार्थी आश्रमांमधून विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या कलाकृतीतून साकारलेला गणपती उत्सव विद्यार्थ्यांच्या आनंद उत्साहाची साक्ष देत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दापोडी येथील सरस्वती अनाथ शिक्षण आश्रमात महाराष्ट्रातील विविध भागातून आलेली तीस मुले निवासी राहून परिसरातील विविध शाळा, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून शिक्षण घेतात. आश्रम म्हणजे त्यांचे घरच कोरोना महामारीचे संकट आले आणी सार्वजनिक जीवन, आनंदावर मुक्तवावर करण्यावर बंधने आली.

कोरोनाच्या पिंजऱ्यात अडकले तमाशा कलावंत

लॉकडाऊन काळात येथील विद्यार्थ्यांनी स्व:तातील विविध कलागुणांना वाव देत भित्तिपत्रकातून निवासी वर्ग सजावट केली आहे. यात कुणी चित्रांच्या माध्यमातून महापुरूषांची पेंटींग चित्रे साकारली. तर कुणी हस्तकलेतून विविध शोभेच्या वस्तू बनवल्या आहेत. या सर्व वस्तू गणपती सजावटीसाठी विद्यार्थ्यांनी वापरल्याने शैक्षणिक अभ्यासाचे उद्दीष्ट ही जपले आहे.

बिल्डर आणि ग्राहकांमधील वाद मिटवण्यासाठी 'महारेरा'चा पुढाकार; 'अशी' केली जात आहे मदत!

विद्यार्थ्यांनी लॉकडाउन काळात पालखी, बाटली पेंटिंग, कोविड १९ योद्धयांसाठी संदेश, कागदी घड्याळ, सूर्यमाला, पेपर बॅग, डिझाईनिंग, चित्रकला खोली सजावट, कागदी कपडे, मखर, इत्यादी वस्तू बनवल्या. या कामात संस्थापक अध्यक्ष डी. एल. सुरवसे, उपाध्यक्षा पौर्णिमा कांबळे, अधीक्षक विश्वनाथ साठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तर आश्रमातील शिक्षक महादेव गायकवाड यांना ह्या कलाकृती मुलांकडून करून घेतल्या आहेत. या आश्रमात एकुण तीस विद्यार्थी निवासी आहेत. महाराष्ट्र समाजकल्याण विभागा मार्फत येथे महाराष्ट्रातील विविध भागातून विद्यार्थी निवासी राहून इतर शाळा, महाविद्यालय, औद्योगिक उद्योग संस्थांमधून शिक्षण घेतात.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: orphanage students decorate the Ganapati Bappa artwork of the study