

Ladkya Bahini registration hits roadblocks
sakal
पिंपरी : वडील-पती हयात नसलेल्या अथवा घटस्फोटित ‘लाडक्या बहिणींना आधार क्रमांक उपलब्ध नसल्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे विधवा, निराधार आणि एकल महिलांनी या नियमाविरोधात नाराजी व्यक्त करत शासनाने त्याला पर्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लाखो महिलांनी नोंदणी केली आहे. परंतु, राज्य शासनाने बोगस लाभार्थी ओळखणे आणि पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी प्रत्येक लाभार्थी महिलेला ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे.