
कोरोनानंतर बदललेल्या आर्थिक परिस्थितीमुळे वीजग्राहकांकडून बिले भरण्यास अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. यामुळे महावितरणवर २४५ कोटींच्या थकबाकीचे ओझे पडले आहे. त्यापैकी महिनाभरात ७६ कोटी रुपये वसुली झाली आहे. परिणामी महावितरणलाच वसुलीच्या आव्हानाचा ‘शॉक’ बसला आहे.
पिंपरी - कोरोनानंतर बदललेल्या आर्थिक परिस्थितीमुळे वीजग्राहकांकडून बिले भरण्यास अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. यामुळे महावितरणवर २४५ कोटींच्या थकबाकीचे ओझे पडले आहे. त्यापैकी महिनाभरात ७६ कोटी रुपये वसुली झाली आहे. परिणामी महावितरणलाच वसुलीच्या आव्हानाचा ‘शॉक’ बसला आहे.
राज्य सरकारच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो ग्राहकांनी बिले भरलेली नाहीत. या वाढत्या थकबाकीमुळे महावितरण रडकुंडीला आले आहे. शहरात तीन लाख ग्राहक आहे, त्यापैकी दोन लाख ३२ जणांनी बिले भरलेली नसल्याने थकबाकी तब्बल २४५ कोटी रुपये झाली असून, कंपनीची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे महावितरणने वसुली मोहीम जोरात सुरू केली आहे. प्रत्येक महिन्यात ग्राहकांकडून येणाऱ्या महसुलापैकी सुमारे ८५ ते ९० टक्के खर्च वीज खरेदीवर होत आहे. दर महिन्याला अनेकजण बिल भरत नसल्याने वीज खरेदीसाठी लागणारी रक्कम भरताना कंपनीला नाकी नऊ आले आहे. घरगुती ग्राहकांबरोबरच औद्योगिक थकबाकी आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
लॉकडाउनमुळे आर्थिक मंदीमुळे सर्वच व्यापाऱ्यांवर परिणाम झाला आहे. ग्राहकांच्या सेवेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या दैनंदिन संचलनासह देखभाल-दुरुस्तीबाबतही समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे शहरातील दोन कोटी ३२ लाख ग्राहकांकडे असणारी २४५ कोटी रुपये वसुली करण्याचे आव्हान कंपनीसमोर आहे.
पिंपरी चिंचवड : वाकड रस्त्याचा आज निर्णय; आयुक्त देणार खुलासा
ग्राहक निर्धास्त
यापूर्वी थकबाकीदारांचा वीजजोड तोडण्यात यायचा, आता कोरोनामुळे थकबाकीदारांची वीजजोड तोडण्याचे आदेश नसल्याने ग्राहकांनी बिल भरण्यास हात वर केले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे.
पिंपरीतील शगुन चौक परिसरातील वाहतुकीत बदल
ग्राहकांनी वीजबिल न भरल्यास जनतेला अखंडित पुरवठा करणे कठीण होणार आहे. त्यामुळे थकीत रक्कम वसूल करण्याची मोहीम हाती घेतली असून, ग्राहकांनी त्यास प्रतिसाद द्यावा.
- शिवाजी वायफळकर, कार्यकारी अभियंता, पिंपरी विभाग
वसुली पथके नियुक्त केली आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून सर्व कर्मचारी वसुलीच्या कामाला लागलो आहोत. ग्राहकांनी थकीत बिल भरण्यावर भर द्यावा; जेणेकरून त्यांची थकबाकी वाढणार नाही.
- राहुल गवारे, कार्यकारी अभियंता, भोसरी विभाग
Edited By - Prashant Patil