आमदार सुनील शेळके म्हणतायेत, 'धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय जलपूजन नाही'

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 September 2020

आज (मंगळवारी) पवना धरणाचे जलपूजन शेळके यांनी सपत्नीक केले.

पवनानगर (ता. मावळ) : "एक वर्षात धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावणार. त्याशिवाय पुढच्या वर्षी जलपूजन करणार नाही," असे आश्वासन आमदार सुनील शेळके यांनी दिले. आज (मंगळवारी) पवना धरणाचे जलपूजन शेळके यांनी सपत्नीक केले. त्यावेळी ते बोलत होते.

जोरदार पावसामुळे पवना धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे जलसाठ्याचे पुजन आमदार शेळके व पत्नी सारिका शेळके यांच्या हस्ते आज करण्यात आले. पवना धरण हे मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे महत्त्वाचे धरण आहे. ऑगस्टमध्ये मावळ परिसरात झालेल्या पावसामुळे हे धरण ९८ टक्के भरले असून, धरणातून दोन दिवसांपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येत आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात रुग्णांच्या तपासण्यांवर तपासण्या 

आरोपीचा पोलिस आयुक्तालयात आत्महत्येचा प्रयत्न

दरम्यान, जलसाठ्याच्या पुजनप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम, कुसुम काशीकर, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, राजश्री राऊत, सुभाष जाधव, दीपक हुलावळे, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक नरेंद्र ठाकर, ज्येष्ठ नेते महादुभाऊ कालेकर, चंद्रकांत दहिभाते, नारायण ठाकर, नामदेव ठुले, ज्ञानेश्वर गोणते, संजय मोहोळ यांच्यासह सर्व पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

शेळके म्हणाले, "यावर्षी कोरोना पाठोपाठ निसर्ग चक्रिवादळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. परंतु, ऑगस्टमध्ये झालेल्या जोरदार पावसाने धरण भरले. सर्व शेतकऱ्यांसाठी ही समाधानाची बाब आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pavana dam jalpujan by mla sunil shelke maval taluka