
अंदाजपत्रकात नवीन असे काही नाही. गेल्या चार वर्षांत तत्कालीन आयुक्तांनी नवीन समाविष्ट भागांवर विशेष भर दिला होता. या अंदाजपत्रकातही रस्ते, सांडपाणीकडे अधिक लक्ष दिले आहे. चांगली मांडणी केली असून, आता अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
अंदाजपत्रकात नवीन असे काही नाही. गेल्या चार वर्षांत तत्कालीन आयुक्तांनी नवीन समाविष्ट भागांवर विशेष भर दिला होता. या अंदाजपत्रकातही रस्ते, सांडपाणीकडे अधिक लक्ष दिले आहे. चांगली मांडणी केली असून, आता अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता अंदाजपत्रकातील प्रस्तावित कामे पूर्ण करण्यासाठी आयुक्तांना आंतरविभागांचा समन्वय, प्रयत्न, कामांचा पाठपुरावा यासाठी केआरए तयार करणे, आढावा बैठक घेणे आणि प्रत्यक्ष फलनिष्पत्तीसाठी प्रयत्न करावे लागतील.
- दिलीप गावडे, सेवानिवृत्त अतिरिक्त आयुक्त
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
या आर्थिक वर्षात ५५८८.७८ कोटी उत्पन्न अपेक्षित धरले आहे. त्यामधून ५५८६.३५ कोटी प्रत्यक्ष खर्च गृहित धरुन २.४३ कोटी शिलकीचे अंदाजपत्रक स्थायी समितीकडे मान्यतेसाठी ठेवण्यात आले आहे. या वर्षी महापालिकेच्या विविध कामांसाठी १६३०.७३ कोटी रकमेची तरतूद आहे. ही बाब स्वागतार्ह आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही रक्कम रुपये २२४ कोटींनी जास्त आहे. याशिवाय विशेष योजना १२३२.३४ कोटी, शहरी गरिबांसाठी १२१४.२९ कोटी इतकी तरतूद केली आहे. प्रस्तावित कामांचा कार्यारंभ आदेश देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करून प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करावा लागेल.
पिंपरी-चिंचवड विजांच्या कडकडाटासह पाऊस; शहरवासियांची धांदल
याशिवाय महिलांसाठी विविध योजना, दिव्यांग कल्याणकारी योजना राबविण्यासाठी नियमाधीन तरतूदी केल्या आहेत. परंतु त्याचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे आहे. पाणी पुरवठ्यासाठी २४० कोटी विशेष निधी आहे. त्यामुळे २४ बाय ७ पाणीपुरवठा, भामा आसखेड प्रकल्पासाठी, निविदा प्रक्रिया यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न करावे लागतील. शहराची लोकसंख्या वाढ विचारात घेऊन आंद्रा व भामा आसखेड धरणातून पाणी आणणे क्रमप्राप्त आहे. यासाठी जलशुद्धीकरण केंद्र उभारणी करण्यास सुरुवात झालेली आहे. भविष्यात यासाठी वाढीव निधी लागण्याची शक्यता आहे.
Video : कोरोनातून सावरुन मदतीला धावणारा अवलिया
बीआरटी मार्गासाठी २६० कोटी, अधिक महसूली कामांसाठी ३२ कोटी रुपये तरतूद केलेली आहे. तत्कालीन आयुक्तांनी वाहतुकीची निकड विचारात घेऊन भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक विनाविलंब होण्यास निश्चित मदत होइल. या वर्षीच्या अर्थसंकल्पात भांडवली कामांसाठी विद्युत विभागासाठी १७२.०५, जलनि:स्सारण विभागासाठी ९७.२३ कोटी रुपये, पर्यावरण विभागासाठी ८३.७४ इतकी तरतूद केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत या कामांना जास्त तरतूद केलेली आहे. कामे प्रत्यक्षात आणण्यासाठी त्या त्या विभागांना विशेष प्रयत्न करावे लागतील. माहिती व तंत्रज्ञान विभागासाठी पुरेशी तरतूद केली असून, नागरिकांना सेवा मिळण्यासाठी संगणक प्रणाली अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे.
नाशिक फाटा ते वाकड आता सुसाट; पिंपरी-चिंचवड महापालिकेचं बजेट सादर
हे करायला हवे
शहरापुढील सध्याची आव्हाने
कोणासाठी काय तरतूद (कोटी रुपयांत)
Edited By - Prashant Patil