विद्यार्थी उपाशी आणि ठेकेदार तुपाशी;खरेदी साहित्याबद्दल "तूतू-मैमै'

आशा साळवी : सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 January 2021

बालवाडीसाठी टेबल-खुर्च्यांची मागणी दोन वर्षांपूर्वी केली होती. याची आठवण भांडार विभागाला नेमकी लॉकडाउन काळातच होऊन तब्बल एक कोटी 87 लाखांची खरेदी केली आहे.

पिंपरी - विद्यार्थी उपाशी आणि ठेकेदार तुपाशी असेच प्रकार सध्या महापालिकेत सुरू आहेत. "शाळा बंद, टेबल-खुर्च्या कोणासाठी?' अशी बातमी "सकाळ'मध्ये दोन जानेवारीला प्रसिद्ध झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. खरेदी केलेले साहित्य नेमके कोठे ठेवले आहे? यावर उपस्थित केलेल्या प्रश्‍नावर शिक्षण विभाग व भांडार विभाग एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. तसेच बातमी प्रसिद्ध होताच सुटीच्या दिवशी गोदामात केवळ दिखाव्यापुरते साहित्य आणून खरेदीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. बालवाडीसाठी टेबल-खुर्च्यांची मागणी दोन वर्षांपूर्वी केली होती. याची आठवण भांडार विभागाला नेमकी लॉकडाउन काळातच होऊन तब्बल एक कोटी 87 लाखांची खरेदी केली आहे.

मागणी बस्करपट्ट्यांची पुरवठा टेबलचा
महापालिकेच्या शाळांनी पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी बस्करपट्ट्यांची मागणी केली होती. त्याऐवजी 59 बालवाड्यांनी तीन हजार 312 लहान बाक व टेबलची मागणी केल्याचे भासवी शिक्षण विभागाने भांडार विभागाकडे उपलब्ध तरतुदीनुसार तीन हजार 339 नगाची मागणी केली. भांडार विभागाने पाच मार्च 2020 रोजी (तब्बल 15 महिने उशिरा) कामास मान्यता देत पुरवठा आदेश दिले. तोपर्यंत शहरात कोरोनाचा शिरकाव झाला होता. 23 मार्चपासून शाळा बंद झाल्या होत्या. कोरोनाची परिस्थिती पाहता इतर खरेदीप्रमाणे टेबल खुर्च्यांची खरेदीला स्थगिती देता आली असती. परंतु दिली नसल्याची वस्तुस्थिती आहे. इतर शालेय साहित्यामध्ये तत्परता का दाखवली नाही.

''चंद्रकांत पाटलांनी पुन्हा कोल्हापूरला येऊन दाखवावं''

साहित्य कुठे ठेवले आहे?
साहित्य कुठे ठेवले आहे? या प्रश्‍नांचे उत्तर कोणालाही देता आले नाही. पालिकेतील भांडार अधिकारी मुबारक पानसरे, नेहरूनगरमधील भांडारपाल रवींद्र शिलेवंत, सहायक भांडारपाल अनिल माने यांनी प्रत्येकाने वेगवेगळे ठिकाणांची नावे सांगितली. एकाही अधिकाऱ्यांच्या बोलण्यात एकवाक्‍यता आढळून नाही, यावरूनच नक्कीच खरेदीचे गौडबंगाल असल्याचे दिसून येते.

मागणीचे परिपत्रक नाही
कुठल्याही साहित्याची मागणी करण्यापूर्वी शाळांना मुख्याध्यापकांच्या नावे परिपत्रक काढावे लागते. घाई गडबडीत खरेदी करण्याच्या प्रयत्नात शिक्षण विभागाने परिपत्रक काढलेले नाही. साहित्य तपासणीसाठीच्या लॅबचे रिपोर्टदेखील नाहीत.

""शिक्षण विभागाने मागणी केल्यामुळे खरेदी केली. कोरोना येईल असे माहीत नव्हते. एप्रिल, मे महिन्यात पुरवठा केल्यामुळे संबंधित ठेकेदाराचे बिल अदा करण्यात आले. शिक्षण विभागाने खरेदीला स्थगिती देण्याची मागणी करणे आवश्‍यक होते.
-मंगेश चितळे, उपायुक्त मध्यवर्ती भांडार विभाग

"पैसे भरले तरी मीटर नाही; महावितरणचा अजब कारभार!

""2019 च्या सर्व्हेक्षणानुसार मागणी केली होती. पूर्तता होईपर्यंत लॉकडाउन झाले. शाळा बंद केल्या. भांडार विभागाने परिस्थितीचा आढावा घेऊन खरेदी करायची की नाही? याचा निर्णय घ्यायचा होता. शाळा बंद असल्यामुळे मी साहित्य ताब्यात घेणार नाही.''
-ज्योत्स्ना शिंदे, प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग

उपमुख्यमंत्री अजित पवार MPSCमध्ये लक्ष घालणार; रोहित पवारांच्या पत्राला दिला रिप्लाय

कधी -काय -घडले
-शिक्षण विभागाची भांडार विभागाकडे मागणी - 14 फेब्रुवारी 2029
-आयुक्तांकडे प्रशासकीय मान्यतेसाठी - 15 जुलै 2019
-आयुक्तांची प्रशासकीय मान्यता - 25 जुलै 2019
-नीलकमल कंपनीला काम देण्यास आयुक्तांची मान्यता - 1 जानेवारी 2020
-स्थायीची मान्यता - 20 फेब्रुवारी 2020
-नीलकमल कंपनीला कामाचा आदेश - 5 मार्च 2020
-निलकमलकडून साहित्याचा पुरवठा - 26 मे 2020
-साहित्य ताब्यात घेण्यासाठी भांडाराचे शिक्षण विभागाला पत्र - 2 जून 2020 व 18 जून 2020
-कोविडमुळे शाळा बंद असल्याचे शिक्षण विभागाचे पत्र - 26 जून 2020


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pcmc educational department purchased material for school But Not showing physically

Tags
टॉपिकस
Topic Tags: