esakal | ‘स्थायी’चा रात्रीस ‘खेळ’ चाले

बोलून बातमी शोधा

पिंपरी - महापालिका स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष संतोष लोंढे यांच्या कार्यकाळातील शेवटची सभा शुक्रवारी रात्री झाली, त्या वेळी सभागृहाबाहेर असलेला पोलिस बंदोबस्त.}

पिंपरी महापालिका स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष संतोष लोंढे यांच्या कार्यकाळातील शेवटची सभा शुक्रवारी रात्री झाली. ऐरवी दुपारी दोन वाजता साप्ताहिक बैठक होते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून अध्यक्ष कार्यकाळ संपल्याची शेवटची सभा सायंकाळी सुरू होऊन रात्री संपते, असा नवा पायंडा पडला आहे.

‘स्थायी’चा रात्रीस ‘खेळ’ चाले
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - महापालिका स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष संतोष लोंढे यांच्या कार्यकाळातील शेवटची सभा शुक्रवारी रात्री झाली. ऐरवी दुपारी दोन वाजता साप्ताहिक बैठक होते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून अध्यक्ष कार्यकाळ संपल्याची शेवटची सभा सायंकाळी सुरू होऊन रात्री संपते, असा नवा पायंडा पडला आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले, असून रात्रीस खेळ ‘स्थायी’चा चाले, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्थायी समिती ही महापालिका कारभाराची सर्वात शक्तिशाली विषय समिती म्हणून ओळखली जाते. अन्य विषय समित्यांनी मंजूर केलेले ‘आर्थिक’ प्रस्तावही या समितीकडेच मंजुरीसाठी येतात. आयुक्तांच्या प्रस्तांवासह सर्व खर्चाच्या तरतुदींनासुद्धा स्थायीच मंजुरी देते. त्यामुळे ‘महापालिका तिजोरीच्या चाव्या स्थायीकडे असतात,’ असे म्हटले जाते. परिणामी या समितीचे सदस्य होण्यासाठी व सदस्य झाल्यानंतर अध्यक्ष होण्यासाठी नगरसेवकांमध्ये चुरशीची स्पर्धा असते. पक्ष नेतृत्वच उमेदवार ठरवत असते. परंतु, काही वेळा पक्ष नेतृत्वचा आदेश झुगारून स्थानिक नेते आपल्या मर्जितील व्यक्तींची नावे सुचवत असतात. त्याचीच प्रचिती गेल्या आठवड्यात बघायला मिळाली. त्याबाबत तक्रारी झाल्यने एका पक्षाच्या गटनेत्याला राजीनामा देण्याचा आदेश पक्षाने दिला आहे. अनेकदा विषय मंजूर करण्यावरून वादविवादही यापूर्वी झाले आहेत. तशी स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी शुक्रवारच्या सभेवेळी सभागृहाबाहेर पोलिस बंदोबस्त होता.

भोसरीतील बॅडमिंटन हॉलची दुरवस्था; वूडन कोर्ट खराब झाल्याने खेळताना दुखापती

महापालिकेतील पक्षीय बलाबलनुसार स्थायी समितीची सदस्य संख्या ठरवली जाते. सध्या महापालिकेचे ३२ प्रभाग असून १२८ नगरसेवक आहेत. स्थायी समितीचे सोळा सदस्य आहेत. त्यात सत्ताधारी भाजपचे दहा, विरोधी पक्ष राष्ट्रवादीचे चार, शिवसेना व अपक्ष आघाडीचे प्रत्येकी एक सदस्य आहेत. रविवारी (ता. २८) आठ सदस्यांचा दोन वर्षांचा कार्यकाल पूर्ण होत आहे. त्यात विद्यमान अध्यक्ष संतोष लोंढे यांचाही समावेश आहे. त्यांच्या कार्यकालातील शेवटची सभा शुक्रवारी झाली. 

वाकडमध्ये पोलिस अधिकाऱ्याची पिस्तूल ओढून धक्काबुक्की

नवीन कारभारी मार्चपासून
महापालिका स्थायी समितीच्या रिक्त होणाऱ्या आठ जागांवर नवीन आठ सदस्यांची नियुक्ती गेल्या आठवड्यात झाली आहे. मात्र, विद्यमान सदस्यांचा कार्यकाल रविवारी संपत आहे. त्यामुळे नवीन कारभारी मार्च महिन्यापासून कारभार पाहणार आहेत. त्यातही अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भाजपमधील अनेकांनी पक्ष नेतृत्वाकडे फिल्डिंग लावली आहे. मात्र, नवीन अध्यक्ष निवड न झाल्याने पुढील आठवड्यातील सभा होण्याची शक्यता कमीच आहे.

Edited By - Prashant Patil