खाकी वर्दीतली माया! आईच्या मृत्यूनंतर 2 दिवस उपाशी बाळाला महिला पोलिसांनी भरवला घास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

female police feed with love to two days of hungry baby after mother died in alandi

खाकी वर्दीतली माया! आईच्या मृत्यूनंतर 2 दिवस उपाशी बाळाला महिला पोलिसांनी भरवला घास

आळंदी : दोन दिवसांपासून बंद घरातून वास येत होता म्हणून शेजा-यांनी पोलिसांना खबर केली. घटनास्थळी पोचल्यावर मृत महिला आणि तिच्यासोबत दीड वर्षाचे भूकेने व्याकूळ बाळ पहूडल्याचे चित्र पोलिसांना पाहायला मिळाले. ही विदारक परिस्थीती पाहून महिला पोलिसांचे हृदय हेलावून गेले. एकीकडे मयत आईला पुढील तपासासाठी नेण्याची पोलिसांची लगबग तर दुसरीकडे दोन दिवस अन्नपाण्यावाचून निपचित पडलेल्या बाळाला मायेने दुध बिक्कीट चारत दोन महिला पोलिसांनीच मावशी बनून आईची माया देत भूक भागवली.

सरस्वती राजेशकुमार(वय२९,उत्तरप्रदेश) मृत महिलेचे नाव आहे. ही घटना भोसरीतील फुगेवस्तीवर सोमवारी(ता.२६)घडली. उत्तरप्रदेशमधून कामधंद्यासाठी आलेले कुटूंब पण लॉकडाऊनमुळे सरस्वती राजेशकुमार यांचे पती गेली महिनाभरापासून गावी गेला होता. मात्र काल सोमवारी(ता.२६) अचानक पोलिसांना एका महिलेने बंद घरात कुजल्याचा वास येत असल्याची खबर दिली.

हेही वाचा: एमपीएससी परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांच्या प्रमाणात वाढ करण्याची ‘स्टुडंट्स राईट्स’ने केली मागणी

पोलिस घटनास्थळी पोचले तर दरवाजा आतून बंद होता. मग खिडकीमधून गजाच्या साहाय्याने दरवाजाची कडी काढली. घरामध्ये सरस्वती राजेशकुमार या मृत अवस्थेत पडल्याचे दिसून आले. तर त्यांच्या शेजारीच दिड वर्षांचा मुलगा निपचित पडून होता. मुलगा अन्नपाण्यावाचून व्याकूळ होता. शेजारील महिलेला सांभाळ करण्यास सांगितले. पण कोणी जवळ घ्यायला तयार होईना. अखेर घटनास्थळी तपासासाठी आलेले पोलिस उपनिरिक्षक बी.एस. शिखरे यांनी दिघी पोलिस ठाण्यातील महिला पोलिस सुशिला गभाले आणि रेखा वाजे यांनी मुलाचा सांभाळ करण्यासाठी बोलावून घेतले. दोघींनीही बाळाला दुध बिस्कीट खाऊ घातले आणि नंतर रूग्णालयात उपचारासाठी नेले.

वडमुखवाडी आणि दिघी येथील दोन रूग्णालयात बाळाचा उपचारासाठी नेले होते. बाळाची कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्याने त्यास दिघी येथील शिशुगृहात ठेवले. तर मयत सरस्वती राजेश कुमार हीचा मृत्यू नेमका कशाने झाला यासाठी तिला वायसीएम रूग्णालयात नेले. अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण कळेल. बाळाच्या वडिलांना सदरची घटना पोलिसांनी कळवली असून ते उत्तरप्रदेशमधून बाळाला नेण्यासाठी येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा: ज्येष्ठ नागरिकांची लशीसाठी वणवण

दरम्यान सुशिला गभाले आणि रेखा वाजे यांनी बाळाबद्दल दाखवलेल्या मायेचे कौतुक सर्वत्र होत आहे. फुगेवस्ती येथील घटनास्थळी घराच्या बाजूलाच मांडी घालून दोघींनी बाळाला दुध बिस्कीट चारले. त्यामुळे बाळाला थोडे बळ मिळाले. आईचे छत्र हरविले मात्र तात्पुरते का होईने महिला पोलिसांनी दिवसभर मावशी बनून बाळाला माया दिल्याने आजूबाजूचे रहिवाशी कौतुक करत होते.सदर घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक बी.एस.शिखरे करत आहेत.

हेही वाचा: बेडच्या माहितीचे डॅश बोर्डच बेहोश

Web Title: Female Police Feed With Love To Two Days Of Hungry Baby After Mother Died In

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune News
go to top