
पिंपरी येथून बेपत्ता झालेल्या चिटफंड व्यवसायिकाचा रायगडमधील महाड येथे मृतदेह आढळला. ते (गुरुवारी ता. 4) पिंपरीतून बेपत्ता झाले होते. पोलिस व नातेवाईकांडून शोध सुरु असतानाच त्यांचा मृतदेह आढळला.
पिंपरी - पिंपरी येथून बेपत्ता झालेल्या चिटफंड व्यवसायिकाचा रायगडमधील महाड येथे मृतदेह आढळला. ते (गुरुवारी ता. 4) पिंपरीतून बेपत्ता झाले होते. पोलिस व नातेवाईकांडून शोध सुरु असतानाच त्यांचा मृतदेह आढळला.
भरतनाट्यम, शास्त्रीय गायनाची मेजवानी; स्वरसागर संगीत महोत्सवास प्रारंभ
आनंद साहेबराव उनवणे (वय 45, रा. नर्मदा बिल्डींग, म्हाडा कॉलनी, मोरवाडी, पिंपरी) असे खून अपहरण करून खून झालेल्या व्यवसायिकाचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाऊ विष्णू उनावणे यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
आनंद यांचा चीटफंडचा व्यवसाय होता. गुरुवारी ते अचानक बेपत्ता झाले. नातेवाईकांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आनंद यांच्या मोबाइलच्या कॉल डिटेल्सवरून तपासाला सुरुवात केली. शोध सुरू असतानाच आनंद यांचा मृतदेह शनिवारी (ता.6) महाड येथे पाण्यात आढळला.
महाड येथे आढळलेल्या मृतदेहाचे फोटो पिंपरी पोलिसांना पाठविले असता मृतदेहाची ओळख पटली. दरम्यान, आनंद यांचे अपहरण कोणी व कोणत्या कारणासाठी केले. मारेकरी कोण आहेत, याचा तपास पोलिस करीत आहेत.
Edited By - Prashant Patil