Corona Update : पिंपरी-चिंचवडमध्ये ४५ नवीन रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

Corona Update : पिंपरी-चिंचवडमध्ये ४५ नवीन रुग्ण

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी ४५ नवीन रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ७६ हजार ९९५ झाली आहे. आज ३५ जण कोरोनामुक्त झाले. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख ७२ हजार ८०० झाली आहे.

हेही वाचा: बलात्काऱ्यांना नपुसंक करणं इस्लामविरोधी; पाकने हटवली कायद्यातील तरतूद

सध्या ४२२ सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत शहरातील चार हजार ५०४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयांत २२१ रुग्ण उपचार घेत आहेत. २०१ रुग्ण होम आयसोलेट आहेत. आजपर्यंत २४ लाख ५३ हजार ३२६ व्यक्तींना लस देण्यात आली आहे.

हेही वाचा: Pimpri chinchwad : शहरात शनिवारी कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड मिळणार

शहरात सध्या १६ मेजर व २५० मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील २७४ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. ९६५ जणांचे सर्वेक्षण करण्यात आले.

loading image
go to top