Pimpri chinchwad : शहरात शनिवारी कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड मिळणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Covid-19-vaccine

Pimpri chinchwad : शहरात शनिवारी कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड मिळणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शहरातील १८ वर्षांपुढील नागरिकांना शनिवारी (ता.२०) ‘कोविशिल्ड’, ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप, ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने आणि किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे.

‘या’ केंद्रांवर मिळणार ‘कोविशिल्ड’

ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल आकुर्डी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले (जुने तालेरा) रुग्णालय चिंचवड, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल,जुने खिवंसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, अंकुशराव लांडगे सभागृह भोसरी, यमुनानगर रुग्णालय, जुने जिजामाता रुग्णालय, निळु फुले नाटय गृह पिंपळे गुरव, अण्णाभाऊ साठे माध्यमिक विद्यालय संततुकाराम नगर पिंपरी, हेगडेवार जलतरण तलाव प्राधिकरण, संजय काळे सभागृह पॅन आर्थो रुग्णालया समोर, साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना, आर.टी.टी.सी सेंटर, फकिरभाई पानसरे उर्दु शाळा चिंचवड स्टेशन, पिं.चिं.म.न.पा. शाळा पवनानगर काळेवाडी, मनपा शाळा वाल्हेकरवाडी, मनपा शाळा किवळे, बिजलीनगर दवाखाना, सेक्टर नं.२९ आठवडी बाजार शेजारी रावेत, बापुराव ढवळे प्रायमरी स्कुल पुनावळे, जिल्हा परिषद शाळा ताथवडे, नेहरुनगर उर्दु शाळा, क्वालिटी सर्कल भोसरी,पिं. चिं. मनपा. शाळा, खराळवाडी, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल , इंद्रयनी नगर भोसरी, पिं. चिं. मनपा. कन्या शाळा चिखली या केंद्रांवर कोविन अ‍ॅपवरुन बुकिंग केलेले ५० टक्के लाभार्थी आणि ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन पद्धतीने ५० टक्के लाभार्थ्यांना ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत लसीकरण होणार आहे.

हेही वाचा: काँग्रेसकडून उद्या देशभरात 'किसान विजय दिवस', कार्यक्रमांचं आयोजन

‘या’ ठिकाणी ‘कोव्हॅक्सिन’ चा डोस

इ.एस.आय.एस हॉस्पीटल मोहननगर चिंचवड, प्रेमलोक पार्क दवाखाना, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, जुने खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव नवीन भोसरी रुग्णालय, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल‍ शिवतेज नगर, यमुनानगर जुने जिजामाता रुग्णालय, निळु फुले नाटय गृह पिंपळे गुरव, या ठिकाणी ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.

हेही वाचा: बलात्काऱ्यांना नपुसंक करणं इस्लामविरोधी; पाकने हटवली कायद्यातील तरतूद

परदेशी जाणाऱ्यांसाठी नवीन जिजामाता रुग्णालय सकाळी ९ सायंकाळी ६ पर्यंत लसीकरण सुरु राहणार आहे. स्तनदा माता, गरोदर महिलांसाठी लस जुने भोसरी रुग्णालय, कुटे मेमोरिअल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, अण्णाभाऊ साठे माध्यमिक विद्यालय संत तुकारामनगर पिंपरी, अहिल्यादेवी होळकर शाळा सांगवी, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय आणि जुने तालेरा रुग्णालय येथे स्तनदा माता, गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

loading image
go to top