पिंपरी चिंचवड भाजपचे नगरसेवक लक्ष्मण उंडे यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 26 September 2020

महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक लक्ष्मण धोंडू उंडे (वय 55) यांचे आज (ता. 26) कोरोनामुळे निधन झाले. थेरगावमधील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांची महिनाभरापासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज आज संपली. दरम्यान, कोरोनाने तीन विद्यमान नगरसेवकांचा बळी घेतल्याने राजकीय वर्तुळात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पिंपरी - महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक लक्ष्मण धोंडू उंडे (वय 55) यांचे आज (ता. 26) कोरोनामुळे निधन झाले. थेरगावमधील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांची महिनाभरापासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज आज संपली. दरम्यान, कोरोनाने तीन विद्यमान नगरसेवकांचा बळी घेतल्याने राजकीय वर्तुळात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिघी-बोपखेल (प्रभाग क्रमांक चार) मधून लक्ष्मण उंडे भाजपच्या चिन्हावर पहिल्यांदाच निवडून आले होते. त्यांनी स्थायी समितीचे सदस्य म्हणून काम केले आहे. ते माजी सैनिक होते. महिन्याभरापूर्वी त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर थेरगावातील एका खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. तब्येत खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, एक भाऊ असा परिवार होता. दिघी येथील साईपार्क परिसरात ते वास्तव्यास होते. 

 वीज नसल्याने ऑनलाइन स्टडीचे वाजले बारा; नोकरदारही वैतागले!

कोरोनाने घेतला तीन विद्यमान नगरसेवकांचा बळी 
कोरोनाने शहरातील तीन विद्यमान नगरसेवकांचा बळी घेतला आहे. माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने, जावेद शेख आता भाजपचे नगरसेवक लक्ष्मण उंडे यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. याबरोबरच माजी महापौर रंगनाथ फुगे, माजी नगरसेवक साहेबराव खरात, एकनाथ थोरात, लक्ष्मण गायकवाड, हनुमंत खोमणे या पाच माजी नगरसेवकांचे देखील कोरोनामुळे निधन झाले आहे.

मावळात आज दिवसभरात १०० पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri Chinchwad BJP Corporator Laxman Unde Death by Corona Virus