'पिंपरी-चिंचवडमध्ये कोविड रुग्णांसाठी पुनर्वसन केंद्राची गरज'

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 September 2020

कोरोना झाल्यानंतर रुग्ण उपचार घेऊन बरा होतो. मात्र, रुग्णाची श्‍वसनक्रिया दीर्घकाळ सुरळीत पार पडावी, तसेच भविष्यात रुग्णाचे फुप्फुस व्यवस्थितरित्या कार्यरत रहावे, यासाठी पोस्ट कोविड रिहॅबिलेशन सेंटरची (कोविड रुग्ण पुनर्वसन केंद्र) गरज आहे.

पिंपरी : कोरोना झाल्यानंतर रुग्ण उपचार घेऊन बरा होतो. मात्र, रुग्णाची श्‍वसनक्रिया दीर्घकाळ सुरळीत पार पडावी, तसेच भविष्यात रुग्णाचे फुप्फुस व्यवस्थितरित्या कार्यरत रहावे, यासाठी पोस्ट कोविड रिहॅबिलेशन सेंटरची (कोविड रुग्ण पुनर्वसन केंद्र) गरज आहे. रुग्णांसाठी हे केंद्र नक्कीच फायदेशीर असून, पुनर्वसन केंद्राचा प्रस्ताव लवकरच मांडू. त्यासाठी प्रयत्न करत असल्याचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता राजेंद्र वाबळे यांनी सांगितले. 

पिंपरी-चिंचवड : दापोडीतील हॅरिस पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला

वाबळे म्हणाले, की कोरोना कालावधीत ऑक्‍सिजन पातळीचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. फुप्फुसावर हल्ला झाल्याने जीव गमावण्याची वेळ बऱ्याच जणांवर आली आहे. फुप्फुस आकुंचन पावल्यानंतर व्रण तसेच राहतात, त्या व्रणांची वृद्धी होणे गरजेचे आहे. शरिराच्या आतील ही प्रक्रिया किचकट आहे. त्यासाठी रुग्णांना विविध थेरपीचे ज्ञान असणे गरजेचे आहे. कोविड झालेले रुग्ण 14 किंवा 28 दिवसानंतर बरे होतात. मात्र, उपचारानंतर त्यांना योग्य मार्गदर्शन व सल्ला मिळत नाही. 

भामा आसखेडमधून पिंपरी-चिंचवडसाठी जलवाहिनी टाकण्याकरिता 162 कोटींचा निधी मंजूर

बऱ्याच रुग्णांची फुप्फुसाची क्षमता मंदावते. श्‍वसनास अडथळा निर्माण होतो. यासाठी विविध फिजीओथेरपी उपयोगी आहेत. केवळ अंमलबजावणीची गरज आहे. यासाठी खर्चही किरकोळ आहे. केवळ स्पायरोमीटरची गरज आहे. रुग्णाची स्थिती पाहून त्याला किमान तीन ते चार महिन्यांपर्यंत ही थेरपी देता येण्यास मदत होईल. त्याचबरोबर रुग्णांना योगा व प्राणायमचे धडेही श्‍वसनक्रियेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. फिजीओथेरपी विनामूल्य असणार आहे, असेही वाबळे यांनी सांगितले. 

'रेमडेसिव्हिर'ची जादा दराने विक्री करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

सध्या कोविड पुनर्वसन केंद्राची गरज आहे. रुग्णांना श्‍वसन थेरपीचा फायदा नक्कीच होऊ शकतो. वायसीएम परिसराच्या बाहेर यासाठी जागा मिळणे गरजेचे आहे. केवळ प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे. पुनर्वसन केंद्राचा विचार सुरू आहे. लवकरच निर्णय घेऊ. 
- राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri chinchwad city needs covid rehabilitation center