पिंपरी - चिंचवड शहरातील व्हाईट कॉलर गुन्हेगारीचा बिमोड करणार - कृष्ण प्रकाश

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 September 2020

पिंपरी - चिंचवड शाहरातील व्हाईट कॉलर गुन्हेगारी खपवून घेणार नाही. व्हाईट कॉलर गुन्हेगारीचा बिमोड करण्यासह माथाडीच्या समस्या, अवैध धंदे रोखण्यासाठी 'झिरो टोलेरन्स'वर भर देणार आहे. जनता हीच माझी दूत असून समाजव्यवस्था बदलण्यासाठी त्यांची मदत घेणार असल्याचे प्रतिपादन पिंपरी - चिंचवडचे नवनियुक्त पोलिस आयुक्त कृष्णा प्रकाश यांनी केले.

पिंपरी - पिंपरी - चिंचवड शाहरातील व्हाईट कॉलर गुन्हेगारी खपवून घेणार नाही. व्हाईट कॉलर गुन्हेगारीचा बिमोड करण्यासह माथाडीच्या समस्या, अवैध धंदे रोखण्यासाठी 'झिरो टोलेरन्स'वर भर देणार आहे. जनता हीच माझी दूत असून समाजव्यवस्था बदलण्यासाठी त्यांची मदत घेणार असल्याचे प्रतिपादन पिंपरी - चिंचवडचे नवनियुक्त पोलिस आयुक्त कृष्णा प्रकाश यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी चिंचवडचे मावळते पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याकडून नवनियुक्त पोलिस आयुक्त कृष्णा प्रकाश यांनी शनिवारी (ता. 5) पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ उपस्थित होते.
कृष्णा प्रकाश म्हणाले, या भागात माथाडीच्या समस्या आहेत. दबाव गट कार्यरत असल्याचेही समजते. चुकीचे काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. व्हाईट कॉलर, अवैध धंदे चालू असतील तर ते पूर्णपणे बंद केले जातील. पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गैरकृत्य केल्यास त्यांचीही हयगय केली जाणार नाही. पिंपरी - चिंचवड परिसर हा औद्योगिक, आयटी हब म्हणून ओळखला जातो. या भागात शैक्षणिक संस्थांही मोठ्या प्रमाणात आहेत. यापुर्वी दक्षिण मुंबई, सांगली, नगर, मालेगाव, बुलढाणा येथे काम केले आहे. प्रत्येक ठिकाणी वेगळ्या समस्या होत्या. या शहराचा अभ्यास करून कार्यपद्धती निश्चित करणार आहे.

मावळात दिवसभरात रुग्ण संख्येचा कळस; १११ पॉझिटिव्ह, सहा मृत्यू

जनता हीच माझी दुत असून समाजव्यवस्था बदलण्यासाठी त्यांची मदत घेणार आहे. अल्पवयीन गुन्हेगारांना योग्य दिशा देण्यासाठी स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, असेही ते म्हणाले. 

शहरातील 99 टक्के नागरिक कायद्याचे पालन करणारे आहेत. मात्र, जे एक टक्के नागरिक कायदा पाळत नाहीत, त्यांना वठणीवर आणू. पोलिस आणि जनतेने एकत्र येऊन ठरविल्यास समस्यांचे निराकरण होणे शक्य आहे, असेही त्यांनी नमूद केले.

पवना धरण शंभर टक्के भरले, तरीही सोसायट्यांचा पाण्यावर हजारोंचा खर्च

अडचण असल्यास थेट संपर्क साधा
नागरिकांना काही अडचण
त्यांनी आपल्या 8805081111 या क्रमांकावर मॅसेज करावा. तसेच खूपच महत्वाची अडचण असल्यास किंवा गंभीर गुन्ह्याबाबत काही माहिती द्यायची असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन कृष्णा प्रकाश यांनी नागरिकांना केले आहे. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri Chinchwad city white collar crime will be eradicated krishna prakash