भाजप हटाव – देश बचाव, शहर कॉंग्रेसच्या ‘हाहाकार’ जनजागरण अभियानास प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress Logo

शहर कॉंग्रेसच्या ‘हाहाकार’ जनजागरण अभियानास प्रारंभ

पिंपरी : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने ता.१४ ते २९ नोव्हेंबरपर्यंत राज्यभर जनजागरण अभियान सुरु करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसच्या वतीने रविवारी (ता.१४ नोव्हेंबर) रोजी नेहरुनगर येथे देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु आणि महात्मा जोतीराव फुले यांचे आद्यक्रांती गुरु लहूजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. अभियानास सुरुवात करण्यात आली.

हेही वाचा: श्रीमंतांना महागाईचा सर्वाधिक फटका, जाणून घ्या कारण!

त्याअंतर्गत थेरगाव परिसरात पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेचा समारोप थेरगाव येथिल अनुसया मंगल कार्यालयात सभा घेऊन करण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष कैलास कदम, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सचिव आणि पिंपरी चिंचवड प्रभारी विजय बारसे, नरेंद्र बनसोडे, महाराष्ट्र प्रदेश पर्यावरण सेलचे अध्यक्ष अशोक मोरे, प्रदेश सचिव गौतम आरकडे,माजी महापौर कविचंद भाट, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, शहर युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, सेवा दल शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहितुले, महिला नेत्या छायाताई देसले, प्रतिभा कांबळे, मल्याळी समाज नेते के. एम. रॉय, बाबा बनसोडे, विजय ओव्हाळ, हिराचंद जाधव, उमेश बनसोडे, ज्ञानेश्वर मलशेट्टी, आबा खराडे, सतिश भोसले, किरण नढे, राजाराम भोंडवे, इस्माईल संगम, अजिंक्य बारणे, शुशिला धनवत, बसवराज शेट्टी, दादा देडे, नयन पालांडे, रवी नांगरे, विश्वनाथ जगताप आदी उपस्थित होते.

हेही वाचा: ड्रग्ज सापडण्याआधी गुजरातच्या 'त्या' बंदराचं नाव वेगळं - कोल्हे

देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी बहुभाषिक, बहुधार्मिक, अखंडप्राय भारत देशाला एकसंध बांधण्याचे काम केले. देशातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्रबिंदू मानुन धोरणे आखली. त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळेच देशात उद्योग कारखाने उभे राहिले. हेच सार्वजनिक उद्योग भांडवलदारांच्या घशात घालून गोरगरीब जनतेला गुलामगिरीत ढकलण्याचे षडयंत्र मोदी, शहा यांचे सरकार करीत आहे, अशी टिका पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष कदम यांनी केली. स्वागत आयोजक इरफान शेख सुत्रसंचालन युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे आणि आभार याकूब इनामदार यांनी मानले.

loading image
go to top