पिंपरी-चिंचवड शहरात 167 नवीन रुग्ण; 158 जणांना डिस्चार्ज

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 January 2021

पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी 167 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 97 हजार 790 झाली आहे. आज 158 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 94 हजार 316 झाली आहे. सध्या एक हजार 702 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील चार व बाहेरील एका रुग्णाचा मृत्यू झाला. 

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी 167 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 97 हजार 790 झाली आहे. आज 158 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 94 हजार 316 झाली आहे. सध्या एक हजार 702 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील चार व बाहेरील एका रुग्णाचा मृत्यू झाला. 

आजपर्यंत मृत्यू झालेल्या शहरातील रुग्णांची संख्या एक हजार 772 झाली आहे. तर, शहराबाहेरील 736 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या महापालिका रुग्णालयांत 573 रुग्ण उपचार घेत आहेत. एक हजार 129 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील 1002 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात 3 हजार 533 जणांची तपासणी करण्यात आली. आज 819 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 94 हजार 258 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इंग्लंडहून आलेले शहरातील सात जण कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. त्यांचे रिपोर्ट "इंग्लंड स्ट्रेन' तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले असून तीन निगेटीव्ह आहेत. एक रिपोर्ट प्रतीक्षेत आहे. 

भोसरी येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शाळेजवळील रस्त्याच्या पदपथावर अतिक्रमण

इंग्लंडहून आलेले व मुंबई विमानतळावर उतरलेल्या शहरातील 268 प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी 188 प्रवाशांची तपासणी केली असून 181 जणांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. एकूण सात जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. 50 प्रवाशी बाहेरगावी गेले आहेत. निगेटीव्ह आढळलेल्या सात जणांचे नमुने स्ट्रेन तपासणी (नवीन कोरोना) अर्थात जिनोम सिक्केसिंगसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते.

चिखलीत मुख्य चौकामधील भर रस्त्यावर अनधिकृत पथारीवाल्यांचे अतिक्रमण 

आज मृत्यू झालेले शहरातील पुरुष पिंपळे गुरव वय 65, भोसरी वय 68, नेहरूनगर वय 69 आणि महिला दापोडी वय 53 येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील पुरुष जुन्नर वय 67 येथील रहिवासी आहेत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri Chinchwad corona positive new patient