शहरात सोमवारी ६५ केंद्रांवर लसीकरण

कोव्हिशिल्ड लशीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस झालेल्यांना व कोव्हॅक्सिन लशीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस झालेल्यांनाच दुसरा डोस दिला जाणार आहे
Corona vaccination
Corona vaccination sakal media

पिंपरी : कोरोना प्रतिबंधक लसीकरण सोमवारी (ता. १५) शहरातील ६५ केंद्रावर महापालिकेतर्फे केले जाणार आहे. त्यासाठी ३१ हजार ३०० डोस उपलब्ध झाले आहेत. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थींना प्राधान्य दिले जाणार आहे, असे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कळवले आहे.

Corona vaccination
..त्यापेक्षा विक्रम गोखलेंनी राजकीय पक्षात प्रवेश करावा- पृथ्वीराज चव्हाण

कोव्हिशिल्ड लशीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस झालेल्यांना व कोव्हॅक्सिन लशीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस झालेल्यांनाच दुसरा डोस दिला जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर कोव्हिशिल्डचे पाचशे व कोव्हॅक्सिनचे साडेतीनशे डोस उपलब्ध आहेत. कोरोना प्रतिबंधक लशीचे ५० टक्के डोस किऑक्स यंत्रणेद्वारे टोकन घेऊन आणि ५० टक्के डोस ‘ऑन दि स्पॉट’ नोंदणी करून दिले जाणार आहेत. सकाळी दहा ते सायंकाळी सहा अशी लसीकरणाची वेळ आहे. ‘कोविन ॲप’वर सकाळी आठ वाजता नोंदणी सुरू होईल. किऑक्स यंत्रणेद्वारे टोकन घेतलेल्या मात्र, लसीकरणाबाबत एसएमएस आलेल्या नागरिकांनाच लस दिली जाईल.

Corona vaccination
ब्रँड अँबेसिडर राहिलेल्या विक्रम गोखलेंनी एसटीच्या संपावर व्यक्त केल्या भावना!

कोव्हॅक्सिन लसीकरण केंद्र

ईएसआय हॉस्पिटल मोहननगर, फकिरभाई पानसरे उर्दू स्कूल चिंचवड, नेत्र रुग्णालय मासुळकर कॉलनी, जुने खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, नवीन भोसरी रुग्णालय, स्वामी समर्थ बॅडमिंटन हॉल शिवतेजनगर, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी, निळू फुले नाट्यगृह नवी सांगवी या आठ केंद्रांवर कोव्हॅक्सिन दिली जाणार आहे.

गर्भवतींसाठी व्यवस्था

स्तनदा माता व गर्भवतींसाठी जुने भोसरी रुग्णालय, कुटे हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, संत तुकारामनगर, अहिल्याबाई होळकर स्कूल सांगवी, खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी व जुने तालेरा रुग्णालय चिंचवड या केंद्रांवर काही डोस राखीव आहेत.

Corona vaccination
मिलिंद तेलतुंबडेवरील ५० लाखाचं बक्षीस पोलिसांना मिळणार?

लशीचे उपलब्ध डोस

कोव्हिशिल्ड - २८,५००

कोव्हॅक्सिन - २,८००

आजचे लसीकरण केंद्र

कोव्हिशिल्ड - ५७

कोव्हॅक्सिन - ८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com