पिंपरी-चिंचवडमध्ये वर्षभरात १७५ बालगुन्हेगारांची भर

Crime
Crime

पिंपरी - पालक-मुलांमध्ये कमी झालेला संवाद, पराकोटीची विषमता यामुळे मुलांच्या हाती पाटी-पेन्सिल असण्याऐवजी ब्लेड-चाकू आला आहे. परिणामी बालकांच्या हातून घडणाऱ्या गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्यावर्षी तब्बल १७५ बालगुन्हेगारीचे गुन्हे नोंदवले गेले. या गुन्ह्यांत २५६ विधिसंघर्षित मुला-मुलींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या माहितीतून पुढे आलेल्या गंभीर बाबी पालकवर्गाला विचार करायला लावणाऱ्या आहेत. 

प्राप्त आकडेवारीनुसार या गुन्ह्यात चार मुलींचाही समावेश आहे. २५६ पैकी २५२ गुन्हे मुलांकडून घडलेले असून, निगडी पोलिस ठाण्‍यातंर्गत सर्वाधिक आहेत. या बालकांच्या हातून हत्या, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, वाहन चोरी, विनयभंग, बलात्कार यासारखे गंभीर गुन्हे घडले आहेत. अशा विधिसंघर्षग्रस्त मुलांमुलीसाठी पोलिस आयुक्तालय आणि विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून पुनर्वसनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. आजअखेर ३१४ बालकांवर मानसोपचार केले आहेत. या कामातून प्रचंड समाधान मिळत असल्याचे गुन्हे शाखेतील पोलिस हवालदार कपिलेश इगवे यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विधिसंघर्षग्रस्त म्हणजे...
बालगुन्हेगारी कालही होतीच, पण आज ‘थ्रिल’ हा घटक महत्त्वाचा ठरतो आहे. आर्थिक आबाळ, पालकांचे दुर्लक्ष, व्यसने आणि थ्रिल अनुभवायची मानसिकता यामुळे अनेक मुले गुन्हेगारीच्या परत न येणाऱ्या वाटेवरच प्रवास सुरू करताहेत. बालगुन्हेगार कायद्यानुसार अशा गुन्हेगारांना ‘विधिसंघर्षग्रस्त’ म्हणतात. वयाच्या १८ वर्षाखालील आरोपींना विधिसंघर्षग्रस्त बालके म्हटले जाते. या आरोपींवर भारतीय दंडविधान म्हणजे आयपीसीअंतर्गत गुन्हे दाखल होतात. बालकांवरील खटले न्याय अधिनियम १९८६ अंतर्गत चालवले जातात. त्यांच्यासाठी बाल न्यायमंडळ काम करते. त्यांना पालकांच्या देखरेखीखाली किंवा सुधारगृहात पाठवले जाते. अशा प्रकरणात आरोपींना जागेवरच जामीन देण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. 

सुनावणीसाठी त्यांना बाल न्यायमंडळात आणले जाते. सामाजिक दृष्टीने त्यांचा विचार करावा लागतो. अल्पवयीन मुले गुन्हेगारी प्रवृत्तीची नसतात. त्यामुळे त्यांनी कोणता गुन्हा केला, यापेक्षा तो का केला, हे समजून घ्यावे लागते. त्यांच्यात उपजत ती वृत्ती नसते तर पालकांच्या वागण्यामुळे ते तसे बनतात. विधिसंघर्षग्रस्त बालकांसमोर पोलिस किंवा वकिलांनी युनिफॉर्म घालून येऊ नये, त्यामुळे त्यांच्यावर दडपण येऊ शकते, असा नियम आहे. तसेच या बालकांना बेड्या घालण्यासही बंदी आहे.

पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या संकल्पनेतून विशेष बाल पथक गुन्हे शाखेच्यावतीने शहरातील विधिसंघर्षग्रस्त बालक, दिशा भरकटलेले अल्पवयीन बालकांसाठी सामाजिक संस्थांच्या माध्‍यमातून रोजगार मेळावे, कर्ज मेळावे घेऊन अशा बालकांची शक्ती योग्‍य दिशेवर आणण्यासाठी काम करण्यात येत आहे.
- डॉ. सागर कवडे, सहायक पोलिस आयुक्त

गेल्या तीन महिन्यांपासून या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गुन्हेगारीचा शिक्का पुसून टाकण्यासाठी ज्यात त्यांना आवड आहे, त्याचे शिक्षण दिले जाते. खेळ, समुपदेशन, व्यक्तिमत्त्व विकास करण्यावर मेहनत घेतली जात आहे. गरजेनुसार कामाचीदेखील व्यवस्था करून दिली जात आहे.
- संदेश बोर्डे, अध्यक्ष, संदेश बोर्डे स्पोर्ट्‌स फाउंडेशन

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com