dagdu shet
dagdu shet esakal

Pimpri Chinchwad : थेरगावातील 'जय महाराष्ट्र' मंडळ प्रथम; श्रीमंत दगडूशेठ राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर

काळेवाडीतील आझाद मंडळ स्पोर्ट क्लबने चतुर्थ आणि भोसरीतील श्रीराम मंडळाने पाचवा क्रमांक पटकावला.

पिंपरी - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२२ चा निकाल अध्‍यक्ष माणिकराव चव्हाण यांनी जाहीर केला.

थेरगावातील जय महाराष्ट्र तरुण मंडळाने प्रथम, रुपीनगरमधील दक्षता तरुण मंडळाने द्वितीय, वाल्हेकरवाडीतील चिंतामणी मंडळाने तृतीय, काळेवाडीतील आझाद मंडळ स्पोर्ट क्लबने चतुर्थ आणि भोसरीतील श्रीराम मंडळाने पाचवा क्रमांक पटकावला.

dagdu shet
Mumbai High Court : रस्त्यावरील खड्डे, उघडे मॅनहोल प्रकरण हायकोर्टात! मुंबईसह परिसरातील ६ मनपा आयुक्त कोर्टात हजर

स्पर्धेत १९६ पैकी ९० मंडळांनी १४ लाख ८२ हजार रुपयांची बक्षीसे पटकावली. गुरुवारी (ता. १७) चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सायंकाळी साडेपाचला पारितोषिक वितरण होईल. जय महाराष्ट्र मंडळाच्या ‘अजूनही वेळ गेलेली नाही’ जिवंत देखाव्याला ५१ हजार रुपये, दक्षता मंडळाच्या ‘छत्रपती शिवाजी चौक’ या देखाव्यास ४५ हजार,

चिंतामणी मंडळाच्या ‘सोशल मीडिया एक क्रांती, कहर की जहर’ देखाव्यास ३५ हजारांचे, आझाद क्लबच्या ‘कचरा घर मे या दिमाग मे’ देखाव्याला ३० हजारांचे आणि श्रीराम मंडळाच्या ‘स्‍त्री जन्माचे स्वागत करा’ देखाव्याला २५ हजार रुपयांचे बक्षीस मिळाले. सहा मंडळांनी ५१ हजार रुपयांचे ‘जय गणेश भूषण’ पुरस्कार प्राप्त केले.

dagdu shet
Pune Chandani Chowk: "असं निष्ठावंतांचं डावललेलं जिणं"; मेधा कुलकर्णींच्या भावनांचा उद्रेक

थेरगावातील जय महाराष्ट्र मंडळ प्रथम यात पठारे लांडगे तालीम व्यायाम मंडळ भोसरी, जय बजरंग मंडळ निगडी, जयहिंद मंडळ प्राधिकरण, एसकेएफ मंडळ चिंचवड, गांधीपेठ तालीम मंडळ चिंचवड, लांडगे लिंबाजी तालीम मंडळ भोसरी यांचा समावेश आहे.

दत्तात्रेय भोंडवे, श्रीकांत ताकवले, संतोष ढोरे, डॉ. प्रवीण येवले, रामदास चिंचवडे, प्रफुल्ल तोरसे, दिलीप माळी, महेश कोळपकर, संभाजी सूर्यवंशी, डॉ. जितेंद्र वडशिंगकर, राहुल रसाळ, बाळकृष्ण मोझर यांनी परीक्षण केले.

‘क’ प्रभागात लोंढे तालीम मंडळ भोसरी, भोजेश्वर मंडळ भोसरी, आदर्श मंडळ संत तुकारामनगर पिंपरी, सिद्धिविनायक प्रतिष्ठान संत तुकारामनगर, भगवान गव्हाणे तरुण मंडळ भोसरी. आणि ‘ड’ प्रभागात डी वॉर्डफ्रेंड सर्कल, सम्राट मंडळ, उत्कर्ष मंडळ, आनंदनगर मंडळ, शिवांजली मंडळ यांनी पारितोषिक पटकावले.

dagdu shet
Pimpri Chinchwad : माजी उपमुख्यमंत्री रमाकांत खलप यांना ‘यशवंत-वेणू’ पुरस्कार जाहीर

जिवंत देखावे विजेते

नागेश्वर मंडळ आकुर्डी, सेव्हन स्टार स्पोर्ट क्लब रामनगर रहाटणी, श्रीमंत छत्रपती शिवाजी मंडळ संतोषनगर थेरगाव, हनुमान तरुण मंडळ किवळे, शिवराजे प्रतिष्ठान भाजी मंडई पिंपरी, जय गुरुदत्त मंडळ चिंचवडे नगर, ज्ञानदीप मंडळ चिंचवडगाव,

श्री भैरवनाथ मंडळ आकुर्डी, सनसागर मंडळ संभाजीनगर चिंचवड, राजमुद्रा प्रतिष्ठान मोरेवस्ती चिखली, स्वराज्य मंडळ संत तुकारामनगर पिंपरी, त्रिमूर्ती मंडळ रामनगर चिंचवड, श्री तुळजा माता मंडळ तुळजाई वस्ती, श्री साईनाथ तरुण मंडळ, श्रीकृष्ण तरुण मंडळ, सिंहगर्जना मंडळ.

dagdu shet
Pune Metro : मेट्रोच्या कामामुळे बाणेर रस्त्यावर आजपासून वाहतुकीत बदल

उत्कृष्ट स्थिर देखावे विजेते

खंडोबा मंडळ भोसरी, श्री गणेश तरुण मंडळ भोसरी, नरवीर तानाजी मंडळ भोसरी, फुगे माने तालीम मंडळ भोसरी, नवज्योत गणेश मंडळ भोसरी, श्री अष्टविनायक मंडळ, सीझन ग्रुप वेलफेअर ट्रस्ट सांगवी, श्रीकृष्ण क्रांती मंडळ आकुर्डी, छत्रपती शाहू तरुण मंडळ चिंचवड स्टेशन, मोरया मंडळ चिंचवड.

dagdu shet
Mumbai News : काँग्रेसच्या गडात राष्ट्रवादीचे मंत्री; ध्वजवंदनासाठी मुख्यमंत्र्यांकडून चाणाक्ष खेळी

स्थिर व हलते देखावे

गणेश प्रतिष्ठान वाकड, शिवाजी चौक मंडळ पिंपळे निलख, सेवा विकास मंडळ संत तुकारामनगर, यशवंत मंडळ तुळजाभवानी प्रतिष्ठान संत तुकारामनगर, जय महाराष्ट्र व्यायाम मंडळ कासारवाडी, राहीमाई प्रतिष्ठान जुनी सांगवी, समर्थनगर तरुण मंडळ नवी सांगवी, समतानगर मंडळ नवी सांगवी, जय महाराष्ट्र मंडळ दत्तनगर थेरगाव, ढोरेनगर मंडळ जुनी सांगवी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com