पिंपरी-चिंचवडकरांनो! महापालिका आयुक्तांनी लागू केली नवीन नियमावली

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 September 2020

पुरवठयाची साखळी कायम ठेवण्यासाठी आवश्यक वाहतुक वगळता प्रतिबंधीत क्षेत्रामधून नागरिकांना  येणे-जाणे करणेसाठी प्रतिबंध असेल. प्रतिबंधीत क्षेत्र  ( कटेंनमेंट झोन ) विषयक महानगरपालिकेने  वेळोवेळी निर्गत केलेल्या आदेशातील सर्व सुचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.

पिंपरी : कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने नवीन आदेश दिला आहे. त्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रासाठीचा सुधारित  आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बुधवारी रात्री काढला. त्याची अंमलबजावणी बुधवार मध्यरात्रीपासून अर्थात आज गुरुवारपासून (ता. ३) सुरू झाली आहे. हा आदेश 30 सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहे. त्यातील नियमांचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम व भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार दंडात्मक कारवाई केली जाईल.

पुणे : 'न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग'पद्धतीनं सुरू झालंय भुयारी मेट्रोचं काम!​ 
संपुर्णत: प्रतिबंधीत केलेल्या बाबी  -

➢ केंद्रीय गृहमंत्रालयाच्या परवानगीशिवाय सर्व आंतरराष्ट्रीय विमान प्रवास
➢ मेट्रो रेल्वे प्रवास
➢ शाळा, कॉलेज , शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस,
➢ हॉटेल्स, रेस्टॉरंट व इतर आदरातिथ्य सेवा.  (फक्त रुग्णालये, पोलिस ठाणे, एसटी बस स्थानक, रेल्वे स्टेशन, अलगीकरण कक्ष येथील उपहारगृहे सुरू राहतील.)
➢ सिनेमा हॉल , व्यायामशाळा, जलतरण तलाव, बार , सर्व प्रकारचे सभागृह, नाट्यगृह, मनोरंजन पार्क आणि तत्सम जागा
➢ सर्व प्रकारचे सामाजिक , धार्मिक , राजकिय, क्रीडा ,  मनोरंजन , सांकृतिक , शैक्षणिक उपक्रम , सभा संमेलन व तत्सम मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊ शकतील अशा प्रकारचे कार्यक्रम  
➢ सर्व धार्मिक स्थळे , सर्व धार्मिक कार्यक्रम , सभा , संमेलने बंद राहतील.
➢ घराबाहेर पडताना तोंडाला मास्क बंधनकारक, सोशल डिस्टंसिंगचे पालन आवश्यक
➢६५ वर्षावरील व्यक्ती, अति जोखमीचे आजार (मधुमेह, उच्च रक्त दाब, दमा, यकृत व मुत्रपिंडाचे आजार, कर्करोग, HIV बाधित रुग्ण इ.) असलेल्या व्यक्ती, गरोदर महिला, १० पेक्षा कमी वयोगटातील मुले यांना अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर  जाता येणार नाही.

कंटेनमेंट झोनबाबत : वैद्यकिय व अत्यावश्यक सेवा, तसेच अत्यावश्यक वस्तू
पुरवठयाची साखळी कायम ठेवण्यासाठी आवश्यक वाहतुक वगळता प्रतिबंधीत क्षेत्रामधून नागरिकांना  येणे-जाणे करणेसाठी प्रतिबंध असेल. प्रतिबंधीत क्षेत्र  ( कटेंनमेंट झोन ) विषयक महानगरपालिकेने  वेळोवेळी निर्गत केलेल्या आदेशातील सर्व सुचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.
 
 सर्व आस्थापना प्रमुखांनी त्यांचे अधिनस्त कार्यरत कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या मोबाईलमध्ये  आरोग्य सेतू  अॅप आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे स्मार्ट सारथी अॅप डाऊनलोड केल्याची खात्री करुन घ्यावी. आरोग्य सेतू अॅपच्या माध्यमातून रोगाची संभाव्य लागण विषयी सूचना प्राप्त होत असल्यामुळे व्यक्तीस स्वसंरक्षणासाठी त्याचा उपयोग होतो. स्मार्ट सारथी अॅपमध्ये कोव्हीड-१९ बाबत विविध मार्गदर्शक सूचना, आपल्या आजूबाजूला उपलब्ध असणाऱ्या औषधाची दुकाने, महापालिकेचे कोव्हीड-१९ फ्लू क्लिनिक या सोयीसुविधांची माहिती प्राप्त होते.
 
 यांना आहे परवानगी....
- व्यक्ती व सर्व प्रकारच्या मालाची वाहतूक, आंतरजिल्हा, आंतरराज्य प्रवासी वाहतुकीसाठी परवानगीची गरज नाही. 
- पीएमपीची वाहतूक गुरुवारपासून सुरू करण्यात येईल. त्या बाबतचा निर्णय पीएमपी व्यवस्थापन घेईल
- सर्व अत्यावश्यक सेवा पूर्वी दिलेल्या परवानगीनुसार सुरू राहतील.
- शाॅपिंग माॅल, मार्केट सुरू राहतील. पण, त्यातील सिनेमा हाॅल बंद राहतील. फुड कोर्ट, रेस्टाॅरंट येथून पार्सल किंवा घरपोच सेवा सुरू राहील
- अत्यावश्यक सेवा वगळून इतर वस्तुंची दुकाने यापूर्वी दिलेल्या परवानगी व मार्गदर्शक सूचनांनूसार सुरू राहतील.
- हाॅटेल व लाॅज शंभर टक्के क्षमतेने सुरू राहतील
- सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अ व ब दर्जा अधिकारी शंभर टक्के क्षमतेने तर अन्य कर्मचारी तीस टक्के किंवा तीस कर्मचारी यापैकी जास्त असेल त्या प्रमाणात परवानगी असेल. मात्र, सोशल डिस्टंसिंग, मास्क वापरणे बंधनकारक असेल
- सर्व खाजगी आस्थापना तीस टक्के मनुष्यबळानुसार सुरू राहतील. मात्र, घरी जाताना व गेल्यावर काय काळजी घ्यावी, याबाबत त्यांना प्रशिक्षण द्यावे. जेणेकरून संसर्ग पसरणार नाही
- सर्व मैदानी खेळ व व्यायाम प्रकारांना परवानगी
- सर्व सार्वजनिक व खाजगी वाहतूक खालील प्रमाणे सुरु करता येईल.

  •    दुचाकी – फक्त चालक (मास्क व हेल्मेट आवश्यक)
  •    तीन चाकी – चालक  + दोन व्यक्ती
  •   चारचाकी टॅक्सी, कॅब - चालक + तीन व्यक्ती

- सलून व ब्युटीपार्लर या पूर्वी दिलेल्या आदेशानुसार सुरू राहतील 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri Chinchwad Municipal Commissioner implemented new rules