esakal | पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड 
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड 
  • 8.33 टक्के बोनस; 15 हजार सानुग्रह अनुदान एकरकमी मिळणार 

पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : महापालिका कर्मचाऱ्यांना 8.33 टक्के बोनस आणि 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान एकरकमी देण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली. त्यामुळे साडेआठ हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. महापौर उषा ढोरे व कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

पर्यावरणपूरक शहरासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका राबविणार 'हरित सेतू' 

महापालिका कर्मचारी महासंघ आणि महापालिका यांच्यात पंचवार्षिक वेतन करार झाला आहे. या वेतन कराराचे हे अंतिम वर्ष आहे. कोरोना कालावधीत महापालिकेचे उत्पन्न घटल्याने कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानावर गंडांतर येण्याची चिन्हे होती. बोनसची हक्काची रक्कम देण्यास महापालिका आयुक्तांची मान्यता होती. मात्र, सानुग्रह अनुदान देण्यास ते अनुत्सुक होते. या पार्श्‍वभूमीवर महापौर आणि सभागृह नेते नामदेव ढाके यांनी कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह आयुक्तांची गुरुवारी (ता. 29) भेट घेतली. सानुग्रह अनुदान आणि बोनस एकरकमी द्यावा, अशी विनंती केली. चर्चेअंती त्याला मान्यता मिळाली. नंतर दिवाळीपूर्वी सानुग्रह आणि बोनस देण्यात यावा, असे आदेश मुख्य लेखापाल जितेंद्र कोळंबे यांना दिले. 

पिंपरी-चिंचवड शहरात आज 173 नवीन रुग्ण 

चिंचवडे म्हणाले, "कोरोना कालावधीत प्रतिकूल परिस्थितीत कर्मचाऱ्यांनी काम केले आहे. महापालिकेचे उत्पन्न घटले, असे आयुक्तांचे म्हणणे असले, तरी पुढील तीन ते चार महिन्यांत उत्पन्न वाढीसाठी कर्मचारी संपूर्ण योगदान देतील.