
महापालिकेशी केलेल्या करारनाम्याचा भंग करीत खासगी जागेतील कचरा भरला. लाखो रुपयांची बिले वसूल केली, असा आरोप शिवसेना नगरसेवक व महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांनी केला.
पिंपरी : कचऱ्याच्या वजनानुसार 'पेमेंट' दिले जात असल्याने ठेकेदाराने चक्क कचऱ्याचे वजन वाढविण्याची शक्कल लढवली. महापालिकेशी केलेल्या करारनाम्याचा भंग करीत खासगी जागेतील कचरा भरला. लाखो रुपयांची बिले वसूल केली, असा आरोप शिवसेना नगरसेवक व महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांनी केला. त्यांनीच हा प्रकार उघडकीस आणला.
Success Story: नोकरी सांभाळत 'ती' झाली ‘सीए’; एकत्र कुटुंबाची मिळाली साथ!
महापालिकेने ठाण्यातील एजी इनव्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीला शहरातील काही भागातील दैनंदिन कचरा संकलनाचे कंत्राट दिले आहे. कंपनीची कचरा संकलनासाठीची तीन वाहने वाकड परिसरात फिरतात. जेवढा कचरा गोळा केला जाईल, तेवढे पैसे कंपनीला मिळतात. गोळा केलेला कचरा मोशी डेपोत नेला जातो. तिथे कचऱ्याचे वचन केले जाते. रविवारी सकाळी वाकडमधील एकाच ठिकाणी कंपनीची तीन वाहने उभी होती. त्याबाबत शंका आल्याने कलाटे यांनी चौकशी केली असता, एका इमारतीच्या पार्किंगमधून ठेकेदाराचे कर्मचारी कचरा आणत असल्याचे दिसले. त्याबाबत चौकशी केल्यानंतर कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी वरिष्ठांनीच येथील कचरा घेण्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितल्याचे कलाटे म्हणाले. त्यानुसार, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलावून संबंधित प्रकाराची पडताळणी केल्यानंतर तीन वाहनचालक, तीन कचरा वेचक, एक सुपरवायझर व प्रकल्पप्रमुख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये 69 नवीन रुग्ण
दोषींवर कारवाई : हर्डीकर
संबंधित व्यक्तीने आक्षेपार्ह खुलासा केलेला आहे. त्याबाबत चौकशीची आवश्यकता आहे. कचरा कुठला आहे, तो का साठवून ठेवला, आमच्या कर्मचाऱ्यांना इतके दिवस दिसला नाही का? याची चौकशी केली जाईल. दोषींवर कारवाई केली जाईल, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.