पिंपरी-चिंचवड : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना आदरांजली 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

पंडित दिनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

पिंपरी : पंडित दिनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत कार्यक्रम झाला. सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते. 

पिंपरी ते निगडीपर्यंतच्या मेट्रो विस्तारीकरणाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात 

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म मथुरा येथे झाला होता. भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांनी काम केले आहे. डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला. पंडित उपाध्याय कानपूर येथे संघाचे स्वयंसेवक झाले व त्यानंतर प्रचारक म्हणून काम करू लागले. साधी राहणी व उच्च विचारसरणी असा त्यांचा स्थायीभाव होता, असे विचार या वेळी मान्यवरांनी मांडले.

हिंजवडीत सहायक पोलिस निरीक्षकालाच मारहाण 

पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त आमदार लक्ष्मण जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या विधानसभा मंडलात नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र देऊन सन्मान केला. सुरेश शिंदे, भाऊसाहेब जाधव, मारुती कवडे, डॉ. देविदास शेलार आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri-Chinchwad Municipal Corporation homage to Pandit Deendayal Upadhyay