esakal | पिंपरी-चिंचवडच्या कारभाऱ्यांनी घेतली कोरोनामुक्तीची शपथ 
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवडच्या कारभाऱ्यांनी घेतली कोरोनामुक्तीची शपथ 

गर्दीच्या ठिकाणी जाणे आणि गर्दी करणे टाळणार. कोरोना आजाराबद्दल इतरांना प्रेमाने समजून सांगणार,' अशी शपथ महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बुधवारी घेतली.

पिंपरी-चिंचवडच्या कारभाऱ्यांनी घेतली कोरोनामुक्तीची शपथ 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : "आम्ही मास्कचा वापर नेहमी व यथायोग्य पद्धतीने करणार. एकमेकांपासून शारीरिक अंतर व मानसिक जवळिक राखणार. गर्दीच्या ठिकाणी जाणे आणि गर्दी करणे टाळणार. कोरोना आजाराबद्दल इतरांना प्रेमाने समजून सांगणार,' अशी शपथ महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बुधवारी घेतली.

‘अहो, मास्क घाला, गळ्यात कशाला अडकवलाय? पीएमपी कंडक्टरांची वाढली डोकेदुखी

"माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेचा दुसरा टप्पा बुधवारपासून सुरू झाला. त्याचा समारोप 25 ऑक्‍टोबर रोजी होणार आहे. त्याअंतर्गत "पिंपरी-चिंचवडकरांचा निर्धार, करुया कोरोना हद्दपार' कार्यक्रम महापालिका भवनात आयोजित केला होता. त्यात आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सर्वांना शपथ दिली. महापौर उषा ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेवक शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, सहाय्यक आयुक्त आण्णा बोदडे, संदिप खोत, स्मिता झगडे, आशादेवी दुरगुडे, सामाजिक कृती दलाचे डॉ. सुभाष साळुंखे आदी उपस्थित होते.

महापौर ढोरे म्हणाल्या, ""कोरोना संसर्गात रुग्णसंख्येत घट होत असली तरी, त्याच्या समूळ उच्चाटनाची लढाई अजून जिंकायची आहे. त्यासाठी एकजुटीने प्रयत्न करायचा आहे.'' ढाके म्हणाले, ""कोरोना रोखण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळेच कोरोना मुक्तीची मोहीम यशस्वी होईल.'' प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले. 
Video : ‘जंबो’नं दिलं नवं आयुष्य; रुग्णांनी व्यक्त केली कृतज्ञता