
रविवारी शहरातील कोणाचाही मृत्यू झाला नाही. शहराबाहेरील एका रुग्णाचा मृत्यू झाला.
Coronavirus Update: पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी (ता.२१) २९८ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या एक लाख तीन हजार १९८ झाली आहे. तसेच रविवारी ५८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ९८ हजार २५७ झाली आहे. सध्या तीन हजार १११ सक्रिय रुग्ण आहेत.
रविवारी शहरातील कोणाचाही मृत्यू झाला नाही. शहराबाहेरील एका रुग्णाचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील एक हजार ८३० आणि बाहेरील ७७२ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत १८ हजार १४९ जणांना लस देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयांत ९५२ रुग्ण उपचार घेत आहेत. दोन हजार १५९ रुग्ण होम आयसोलेट आहेत.
- पुणेकरांना कोरोनाची पर्वाच दिसत नाही; मार्केटयार्डात तुडुंब गर्दी!
कंटेन्मेंट झोनमधील ५०० घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. त्यातील एक हजार ३९४ जणांची तपासणी केली. ८०१ जणांचे आज विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत एक लाख २९ हजार ९९० जणांचे विलगीकरण करण्यात आले.
आज एक हजार ९२४ संशयित रुग्णालयात दाखल झाले. एक हजार ५५५ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. एक हजार ३०३ जणांचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत. एक हजार ६८३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
- पुण्यात उद्यापासून पुन्हा निर्बंध; संचारबंदीची वेळ जाहीर, शाळा-महाविद्यालयांबाबत मोठा निर्णय
आजपर्यंत सहा लाख ४८ हजार ४०१ संशयित रुग्णालयात दाखल झाले. पाच लाख ४३ हजार ९०० जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. सहा लाख ४२ हजार ९६२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज मृत्यू झालेली शहराबाहेरील व्यक्ती चाकण (वय ७०) येथील रहिवासी आहे.
- पिंपरी-चिंचवडमधील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)