पुणेकरांना कोरोनाची पर्वाच दिसत नाही; मार्केटयार्डात तुडुंब गर्दी!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 February 2021

बाजारात फिरताना अनेक लोक मास्क वापरत नाहीत. अनेकांच्या तोंडला अर्धवट मास्क लावलेले असते. गेटवर सॅनिटाटझरचा वापर केला जात नाही.

मार्केट यार्ड (पुणे) : शहरात पुन्हा कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर बैठका घेऊन फैलाव थांबवण्यासाठी शहरात अनेक निर्बंध लावण्यात आहेत. मात्र, गुलटेकडी मार्केट यार्डात त्या उलट परिस्थितीत अनुभवायला मिळत आहेत. भाजीपाला, फळ, कांदा बटाटा, फुलबाजारातील व्यापारी, खरेदीसाठी ग्राहक, कामगारांना मात्र कोरोनाचे गांभीर्यच नसल्याचे दिसून येत आहे. अनेकजण विनामास्क बाजारात फिरताना दिसत आहेत. तसेच यावर बाजार समितीकडून कोणत्याही प्रकारच्या उपयोजना केलेल्या दिसून येत नसल्याचे समोर आले आहे.

इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी यांना समजून घ्यायचं असेल तर...​

मार्केटमध्ये दररोज दररोज साधारणतः नागरिक, अडते, व्यापारी, किरकोळ खरेदीदार, कामगार यांची बाजारात येण्याची संख्या मोठी आहे. बाजारात दररोज २० ते २५ हजार लोकांची ये जा असते. इतक्या मोठ्या प्रमाणात बाजारात नागरिकांची वर्दळ असतानाही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी समितीकडून उपयोजना केलेल्या दिसून येते नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पुण्यात उद्यापासून पुन्हा निर्बंध; संचारबंदीची वेळ जाहीर, शाळा-महाविद्यालयांबाबत मोठा निर्णय

बाजारात फिरताना अनेक लोक मास्क वापरत नाहीत. अनेकांच्या तोंडला अर्धवट मास्क लावलेले असते. गेटवर सॅनिटाटझरचा वापर केला जात नाही. ग्राहकांचे तापमान तपासणीसाठी थर्मल गणचा वापर केला जात नाही. त्यामुळे कोरोनाबाबत सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होत असून बाजार समितीसह आरोग्य प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे ठरत आहे. भाजीपाला खरेदी करण्यासाठी मार्केटयार्डात मोठी गर्दी होते. यावर अद्याप कोणताही अंकुश नाही. तसेच समितीने नियमावली जाहीर केली असली त्यावर कोणीही अंमलबजावणी करताना दिसून येत नाही. यावेळी बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांना फोनद्वारे संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune citizens dont serious about corona they walk around market yard without masks