पिंपरी-चिंचवडकरांकडून आठवडाभरात ३५ लाखाचा दंड वसूल; वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 November 2020

बहुतांशी वाहनचालक वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करतात. त्यामुळे अपघात वाढतात.

पिंपरी : दिवाळीच्या खरेदीसाठी घराबाहेर पडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. मागील आठवडाभरात राबविलेल्या या मोहिमेत वाहतूक पोलिसांनी तब्बल पाच हजार 107 वाहन चालकांकडून 35 लाख 47 
हजार 300 रुपयांचा दंड वसूल केला. 

'चला मावळे घेऊन येऊ'; किल्ल्यांच्या चित्र खरेदीसाठी बालगोपाळात रमले खासदार!​

पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी 4 ते 11 नोव्हेंबर या आठवडाभरात बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईची मोहीम राबवली. सण-उत्सवांच्या कालावधीत अनेक जण घराबाहेर पडत आहेत. बहुतांशी वाहनचालक वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करतात. त्यामुळे अपघात वाढतात. दरम्यान, अशा बेशिस्त वाहन चालकांना चाप बसावा, यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार आहे. यामुळे वाहतुकीला शिस्त लागेल. तसेच अपघातांचे प्रमाण कमी होईल, असे वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त श्रीकांत डिसले यांनी सांगितले.

बावीस वर्षांपासून राजगडावर वसुबारस साजरा करणारे केशव आरगडे​

प्रकार कारवाई दंड 
ओव्हर स्पीड 560 5 लाख 60 हजार 
रॉंगसाईड ड्रायव्हिंग 1451 14 लाख 51 हजार 
लेन कटिंग 48 10 हजार 
मोबाईल टॉकिंग 476 1 लाख 29 हजार 100 
डेंजरस ड्रायव्हिंग 694 6 लाख 94 हजार 500 
सिग्नल जम्पिंग 637 1 लाख 64 हजार 700 
विना हेल्मेट 696 3 लाख 85 हजार 700 
विना सीटबेल्ट 545 1 लाख 52 हजार 300 
एकूण 5107 35 लाख 47 हजार 300 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri Chinchwad traffic police taken punitive action against motorists who violated traffic rules