

Moshi Dump Yard Row: Building Within 30 Metres Sparks Fresh Controversy
sakal
पिंपरी : मोशी कचरा डेपोत साठलेला कचरा ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पातून २०२६ अखेर संपविण्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला होता. प्रत्यक्षात कचऱ्याचा डोंगर वाढतच राहिला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) स्पष्ट निर्देश दिल्यानंतरही डेपोमध्ये नवीन कचरा टाकणे सुरूच ठेवण्यात आले. त्यामुळे नोटिशीनंतर वर्षभरात सुमारे चार लाख टन अतिरिक्त कचरा जमा झाला, असा आरोप होत आहे. कचरा संपविण्याची मुदत जाहीर करणाऱ्या प्रशासनाने तो का संपवला नाही? याचे उत्तर आता नागरिक मागत आहेत.