पहाटे गारवा, दुपारी ऊन; रात्री उकाडा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Environment

पहाटे गारवा, सकाळपासून सायंकाळपर्यंत उन्हाचा कडाका आणि रात्री उकाडा असा वातावरणाचा अनुभव नागरिक घेत आहेत.

पहाटे गारवा, दुपारी ऊन; रात्री उकाडा...

पिंपरी - पहाटे गारवा, (Cold) सकाळपासून सायंकाळपर्यंत उन्हाचा (Heat) कडाका आणि रात्री उकाडा असा वातावरणाचा (Environment) अनुभव नागरिक घेत आहेत. यामुळे दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट असतो, तर सकाळी व रात्री फिरण्यासाठी लोकांची गर्दी असते. उन्हापासून बचाव करण्यासाठी स्कार्फ, टोपी व गॉगलचा वापर वाढला आहे. बाजारात मिळणाऱ्या थंड पेयांऐवजी घरी बनवलेले लिंबू सरबत व माठातील थंड पाणी भरपूर पाणी प्यावे, असा सल्ला डॉक्टरांचा आहे.

फेब्रुवारी अखेरपासून वातावरणात बदल झाला आहे. आता दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. मात्र, गेल्या शुक्रवारी सायंकाळी अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार अवकाळी पाऊस पडला. यानंतर शनिवारपासून पहाटे गारवा जाणवू लागला आहे. साहजिकच थंड हवेत फिरण्यासाठी गर्दी होवू आहे. सकाळी साडेआठनंतर ऊन वाढायला सुरवात होते. दुपारी बारानंतर पारा चढल्यावर रस्ते सुनसान होवू लागतात. अत्यावश्यक कामासाठीच लोक बाहेर पडतात. महिला सनकोट व स्कार्फ आणि पुरुष टोपी परिधान करून जातात. बाजारपेठा रिकाम्या होतात. सायंकाळी सूर्य मावळल्यावर उकाडा सुरू होतो. रात्री तर जिवाची काहिली होते. त्यामुळे जेवून झाल्यावर कुटुंबासह लोक शतपावलीच्या निमित्ताने सोसायटी आवार, टेरेस, जवळच्या रस्त्यावर जातात.

हेही वाचा: नवीन कायद्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिका प्रभागरचना रद्द

अशी घ्या काळजी...

  • वृद्ध व लहान मुलांनी दुपारी घराबाहेर पडणे टाळावे

  • पांढरा रंग हा परावर्तित असल्याने सुती पांढरी कपडे वापरावेत

  • टोपी व गॉगलचा वापर करायलाच हवा

  • अतिथंड पेयाऐवजी लिंबू सरबत, माठातील पाणी प्यावे.

  • घराबाहेर पडताना सोबत पाण्याची बाटली ठेवावी

  • रसदार फळे, कलिंगड, शहाळे यामुळे अंगातील उष्णता कमी होण्यास मदत होईल

  • आहारात तेलकट व मसालेदार पदार्थ नकोत

Web Title: Pimpri Cold Heat Season Environment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top