पिंपरी : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबांचा १०० टक्के मिळकतकर माफ

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबांना दिलासा; ‘स्थायी’चा निर्णय
Income Tax
Income Tax sakal media

पिंपरी : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शहरातील निवासी मिळकतधारकाच्या कुटुंबांचा शंभर टक्के मिळकतकर माफ करावा, असा निर्णय स्थायी समिती सभेने बुधवारी घेतला. त्यामुळे अशा मिळकतधारकांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. मिळकतकर माफीची उपसूचना सभेत ऐनवेळी मांडण्यात आली.

स्थायी समितीचे सभापती नितीन लांडगे अध्यक्षस्थानी होते. मार्च २०२० पासून आजपर्यंत कोरोमुळे चार हजार ५१३ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यातील निवासी मिळकतधारकांची यादी केली जाणार आहे. त्यांच्या कुटुंबीयांना मिळकतकर माफीसह ४५ कोटी १६ लाख रुपयांच्या खर्चास सभेने मंजुरी दिली. अन्य कामांच्या खर्चामध्ये मोहननगर, काळभोरनगरमधील रस्त्यांसाठी एक कोटी ६५ लाख; वायसीएम रुग्णालय कॉरिडॉर, परिसरातील रस्ते व स्वच्छतेसाठी १५ कोटी ९९ लाख; वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर भागासाठी ३१ लाख; शिवनगरी, प्रेमलोक पार्क आणि दळवीनगर भागासाठी ३० लाख, मैलापाणी प्रक्रिया केंद्र तपासणीसाठी ७६ लाख; साने चौक ते केशवनगर रस्त्यासाठी २७ लाख; बालाजीनगरसाठी सहा कोटी ३३ लाख; ताम्हाणेवस्ती, त्रिवेणीनगरसाठी २८ लाख; पॉलिग्रास हॉकी मैदानासाठी ३२ लाख; आकुर्डीतील कामांसाठी चार कोटी; देहू-आळंदी ३० मीटर रुंद रस्त्यासाठी ९८ लाख; टेल्को रस्त्यासाठी एक कोटी २२ लाख; काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्त्यासाठी एक कोटी २५ लाख; प्रभाग १७ मधील गतिरोधकांसाठी ३३ लाख; चिंचवडेनगर भागातील रस्त्यांसाठी ३४ लाख; शिवनगरी भागातील रस्त्यांसाठी ३४ लाख; प्रेमलोक पार्क, दळवीनगर भागातील रस्त्यांसाठी ३५ लाख; प्रभाग १८ मधील रस्त्यांसाठी २९ लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे.

Income Tax
बिपीन रावत यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार | Bipin Rawat Funeral

असा आहे निर्णय

कोरोनामुळे २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षांत मृत्यू झालेल्या मिळकतधारकांच्या कुटुंबाला दिलासा देण्यात येणार आहे. त्यासाठी २०२२-२३ या वर्षासाठी मिळकतकराचे व करोत्तर बाबींचे दर निश्चित केले जाणार आहेत. ते करताना अशा मिळकतधारकांना सामान्य कर रकमेत १०० टक्के सूट आणि मिळकतकर हस्तांतरण नोंद नोटीस शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी ३१ जानेवारीपर्यंत विशेष मोहीम राबवून सर्वेक्षण करण्यास मंजुरी देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com