पिंपरीत खुनसत्र थांबेना; महिलेचा धारदार हत्याराने खून

मृत कलावती यांच्या पतीचे निधन झाले असून त्या मुलासह भोसरीतील धावडेवस्ती येथे राहत होत्या.
crime
crimesakal

पिंपरी : निगडी, तळेगाव दाभाडे, बाणेर, चिखली, सूस, रावेत येथील खुनाच्या घटना ताज्या असतानाच भोसरीत शनिवारी (ता. २५) पुन्हा एक घटना घडली. यामध्ये महिलेचा धारदार हत्याराने खून करण्यात आला. आठ दिवसांत पाठोपाठ सात खुनाच्या घटना घडल्या आहेत. कलावती धोंडीबा सुरवार (वय ३८, रा. धावडेवस्ती, भोसरी) असे भोसरीत खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

मृत कलावती यांच्या पतीचे निधन झाले असून त्या मुलासह भोसरीतील धावडेवस्ती येथे राहत होत्या. दरम्यान, शनिवारी (ता. २५) रात्री साडेआठच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने घरात शिरून धारदार हत्याराने वार करीत त्यांचा खून केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, आठ दिवसातील ही सातवी घटना आहे.

तीन दिवसांपूर्वी रावेत येथील घटनेत खैरूनबी उर्फ मुन्नी हैदर नदाफ (वय ३८, रा. जाधव वस्ती, रावेत) या महिलेचा तिच्या पतीने खून केला. याप्रकरणी हैदर साहेबलाल नदाफ (रा. लोणी स्टेशन, मूळ-सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मृत व महिला हे दोघे पती-पत्नी असून दोघांमध्ये वारंवार भांडण व्हायचे. तसेच आरोपी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन भांडण करीत असे. पतीच्या त्रासाला कंटाळून मृत महिला तीन मुलांना घेऊन रावेतमधील जाधव वस्ती येथे राहण्यास आली होती. याचा राग आल्याने आरोपी हैदर याने रागाच्या भरात पत्नीचा परकरच्या नाडीने गळा आवळून खून केला. ही घटना बुधवारी (ता. २२) रात्री साडे आठच्या सुमारास घडली. देहूरोड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

crime
शहांचे सहकार मंत्रालय कामाला लागणार

तर दोन दिवसांपूर्वी डांगे चौक येथील घटनेत रोहन दिलीप कांबळे (वय ३०, रा. लक्ष्मी मंदिराजवळ, चांदणी चौक, धायरीगाव) या तरुणाचा खून झाला. याप्रकरणी दिलीप शंकर कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे घरी असताना रोहन यांचा मित्र संदीप जाधव यांनी रोहनच्या वडिलांना फोन करून सांगितले की, रोहन डांगे चौकातील रॉयल कंट्री वाईन्स दुकानासमोर पडला असून त्याच्या नका तोंडातून रक्त आहे. त्यानंतर रोहनच्या वडिलांनी त्याठिकाणी जाऊन चौकशी केली असता रोहनला उपचारासाठी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेल्याचे सांगण्यात आले. तसेच रोहन बुधवारी (ता. २२) रात्री आठच्या सुमारास रॉयल कंट्री वाईन्स या दुकानातून दारू पिऊन बाहेर गेल्याचे त्यांना समजले. दरम्यान, दिलीप कांबळे यांनी रुग्णालयात धाव घेतली असता गुरुवारी (ता. २३) सकाळी अकराच्या सुमारास डॉक्टरांनी रोहनला मृत घोषित केले.

शवविच्छेदन अहवालात रोहन यांच्या डोक्यात कठीण वस्तूने मारल्याने कवटी फुटून त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com