पिंपरी : सिलिंडर गॅसच्या स्फोटात दोघे गंभीर जखमी

घरगुती सिलिंडरमधून बेकायदा व्यावसायिक सिलिंडरमध्ये गॅस रिफलिंग करताना गॅसगळती झाल्याने मोठा स्फोट झाला.
cylinder blast
cylinder blastsakal media

पिंपळे गुरव : येथील जांभुलकर चाळीत आज दुपारी घरगुती सिलिंडरमधून बेकायदा व्यावसायिक सिलिंडरमध्ये गॅस रिफलिंग करताना गॅसगळती झाल्याने मोठा स्फोट झाला. यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रूग्णालयात पाठवले आहे.

प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, जांबुलकर चाळीमध्ये भारत गॅस एजन्सीचे रमेश मनाराम व कुमार दिलीप सुकाराम घरगुती सिलिंडरमधून व्यावसायिक सिलिंडरमध्ये बेकायदा गॅस भरत होते. त्यावेळी गळती झाल्याने स्फोट झाला. त्याची तीव्रता खूप मोठी असल्याने घराच्या खिडक्या फुटल्या व भिंतींना तडे गेले. भिंती एका बाजूला कलल्या असून, घराचा दरवाजा वीस फूट लांब उडून पडला.

cylinder blast
बिपीन रावत यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार | Bipin Rawat Funeral

अरुंद रस्त्यामुळे अग्निशामक दलाची वाहने घटनास्थळापर्यंत पोचू शकली नाहीत. अखेर जवानांना घटनास्थळी दुचाकीवरून जावे लागले. दुर्घटनेत जखमी झालेल्यांना हॉस्पिटलमध्ये पोचवण्यासाठी रुग्णवाहिकाही वेळेत दाखल झाल्या. मात्र, त्याही घटनास्थळी जाऊ शकल्या नाहीत. यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून, याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच, भाडेकरू असल्याची पोलिस ठाण्यात नोंद केली नसेल, तर घरमालकावरही गुन्हा दाखल केला जाईल.

- सुनील टोणपे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सांगवी पोलिस ठाणे

cylinder blast
पिंपरी : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबांचा १०० टक्के मिळकतकर माफ

अशी घटना यापूर्वीही येथे झाली होती. अनधिकृतपणे गॅस भरण्याचे काम चाललेले होते. या भागात अनेक अनधिकृत बांधकामे सुरू असल्यामुळे अग्निशामक दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका पोचू शकल्या नाहीत.

- शशिकांत कदम, नगरसेवक, पिंपळे गुरव

संपूर्ण चाळच अनधिकृत आहे. मालक फक्त घरभाडे घ्यायला येतात. येथे बेकायदा गॅस सिलिंडर भरून दिले जात होते, याकडेही चाळ मालकाने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसते. नागरिकांना प्रशस्त रस्ता करून देणे आवश्यक आहे.

- राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com