esakal | पिंपरी : ‘पीएफ’साठी नागरिकांच्या रांगा
sakal

बोलून बातमी शोधा

Epf office

पिंपरी : ‘पीएफ’साठी नागरिकांच्या रांगा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : कोरोना (corona) काळात उद्भवणाऱ्या अनेक अडचणींमुळे नागरिकांनी पीएफ (Pf) काढण्यावर भर दिल्याने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Epf) कार्यालयात गर्दी होत आहे. शहरभरातून दररोज पीएफसाठी तीन हजारांच्यावर नागरिक नोंद करत आहेत. ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही सुविधा आहेत. परंतु, वेबसाइट वारंवार डाउन होत असल्याने सर्वजण कार्यालयात धाव घेत आहेत. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होत आहे. परिणामी, नागरिकांना ताटकळत कार्यालयाबाहेर प्रतीक्षा करावी लागत आहे. (Pimpri Epf office citizens Queues PF)

कोरोनाने मृत्यू झालेल्या वारसांचीही पीएफ मिळण्यासाठी धडपड सुरू आहे. तसेच, सेवेच्या अवधी दरम्यान मृत्यू झालेल्या वारसांना मिळणारा लाभ, नाव व जन्मतारखेत बदल, त्याचप्रमाणे विम्याच्या लाभासाठी ज्येष्ठांची गर्दी होत आहे. कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर वारस नोंदी, कामगारांना व कर्मचाऱ्यांचा परतावा, सेवानिवृत्तीनंतरचा लाभ, पेन्शनधारकांच्या सेवा तसेच कर्जप्राप्ती, पतीच्या निधनानंतर विधवा महिलांना मिळणारा लाभ अशा विविध सेवांसाठी नागरिक पीएफ कार्यालयात गर्दी करत आहेत. खडकी ते लोणावळापर्यंतचा भाग हा आकुर्डी प्राधिकरणातील पीएफ कार्यालयाअंतर्गत येतो. बरेच नागरिक हे दूरवरून सकाळीच पीएफच्या कामासाठी हजेरी लावत आहेत. यामध्ये बरेच ज्येष्ठ नागरिक व महिलांचा समावेश आहे.

हेही वाचा: शरद पवारांमुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी; अमोल कोल्हे भडकले

अधिकारी म्हणतात...

सर्व सुविधा ऑनलाइन असूनही युवा वर्ग लाभ घेत नाही. बरेच जण अद्यापही पीएफची कामे ऑफलाइन करत आहेत. त्यामुळे गर्दी होत आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्यांना कागदपत्राअभावी अडचणी येत होत्या. तीन व्यक्तींच्या अडचणी बॅंकेसोबत बोलून सोडवल्या आहेत, असे पीएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा: उत्तर प्रदेशात कोरोनामुळं 'कावड यात्रा' अखेर रद्द!

सुविधांची वानवा

पीएफ कार्यालयात जवळपास १८० कर्मचारी काम करत आहेत. या ठिकाणी एकूण ३०० कर्मचाऱ्यांची गरज आहे. नुकतीच काही क्लार्कची भरती झाली आहे. परंतु, तरीही मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. सध्या गर्दीमुळे टोकन पद्धतीने काम सुरू आहे. रोजच्या तक्रार निवारण व चौकशीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी एकच खिडकी आहे.

कोरोनाने मृत्यू झालेल्या कामगारांच्या पत्नींनाही कागदपत्राअभावी धावपळ करावी लागत आहे. कागदपत्रांची पुरेशी माहिती उपलब्ध नाही. ज्येष्ठ नागरिक व महिलांना ऑनलाइनचे ज्ञान नाही. सेवानिवृत्तीधारकांनाही पीएफ कार्यालयात चकरा माराव्या लागतात.

- दत्ता धामणस्कर, कामगार प्रतिनिधी

loading image