पिंपरी : उद्यानांतील कचऱ्यापासून खतनिर्मिती

उद्यानांतील पालापाचोळा व ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ‘कम्युनिटी लेव्हल कंपोस्टिंग’ प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.
Fertilizer by Garbage
Fertilizer by GarbageSakal
Summary

उद्यानांतील पालापाचोळा व ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ‘कम्युनिटी लेव्हल कंपोस्टिंग’ प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.

पिंपरी - उद्यानांतील पालापाचोळा व ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया (Garbage Process) करण्यासाठी ‘कम्युनिटी लेव्हल कंपोस्टिंग’ प्रकल्प (Project) राबविण्यात येणार आहेत. त्याद्वारे दररोज शंभर किलो कचऱ्यावर प्रक्रिया करून खत (Fertilizer) तयार केले जाईल. प्रायोगिक तत्त्वावर असे दोन प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यासाठी अर्थ केअर इक्यूपमेंट कंपनीची नियुक्ती केली आहे. त्यासाठी अपेक्षित असलेल्या २७ लाख रुपयांच्या खर्चास गुरुवारी स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी संचालक मंडळाची बैठक महापौर तथा संचालक उषा ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली स्मार्ट सिटी कार्यालयात झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयुक्त राजेश पाटील, पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, केंद्रीय सचिव ममता बात्रा, संचालक नामदेव ढाके, सचिन चिखले, स्वतंत्र संचालक प्रदीपकुमार भार्गव, यशवंत भावे, सहमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील, निळकंठ पोमण, मुख्य वित्तीय अधिकारी सुनिल भोसले, कंपनी सचिव चित्रा पवार, जनरल मॅनेजर इन्फ्रा अशोक भालकर, कार्यकारी अभियंता मनोज सेठिया, लक्ष्मीकांत कोल्हे आदी ऑनलाईन उपस्थित होते. कम्युनिटी लेव्हल कंपोस्टिंग प्रकल्प टप्प्याने सर्वच उद्यानांत राबविण्यात येईल.

Fertilizer by Garbage
ओमिक्रॉन तपासणी अहवाल येण्यापूर्वीच रुग्णाचा ह्रदयविकाराने मृत्यू

स्मार्ट सिटी अंतर्गत विकास कामांचा विस्तार वाढला आहे. केंद्र सरकारच्या सुचनेनुसार ही विकामकामे होत असून काही कामे पुर्णत्वाकडे आहेत. कोविडमुळे अनेक विकासकामे थांबवावी लागली होती. आता ही कामे पूर्ण करण्यावर भर दिला असल्याचे ढोरे यांनी सांगितले.

असे झाले निर्णय...

  • स्मार्ट सिटी प्रकल्पांना तांत्रिक सल्लागार, प्रकल्प व्यवस्थापन आणि सेवा प्रदान करण्यासाठी इ अँड वायएलएलपी यांना मुदतवाढ

  • सिटी नेटवर्कसह इतर स्मार्ट प्रकल्‍पांसाठी एलअँडटी, इंटिग्रेटेड कमांड सेंटर, इतर स्मार्ट एलिमेंट प्रोजेक्ट विस्तारासाठी टेक महिंद्रला मुदतवाढ

  • स्वतंत्र निविदा प्रक्रियेद्वारे विविध स्मार्ट प्रकल्पांना वीजपुरवठा करण्यासाठी तयार केलेला अर्थसंकल्प व तरतुदींवर चर्चा करून मंजुरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com